ताजेच बेलपत्र आणि तुळसच देवाला अर्पण करावी का? जुनी चालत नाही का? जाणून घ्या

| Updated on: Jan 10, 2025 | 6:13 PM

प्राचीन काळापासून देवाला फुले आणि पाने अर्पण करण्याची परंपरा आहे. प्राचीन काळापासून देवाला फुले आणि पाने अर्पण करण्याची परंपरा आहे. दरवेळी देवाच्या पूजेत ताजी फुलेच अर्पण करता येतात का? तुळशी किंवा बेलपत्र देवाला अर्पण करायचे असेल तर प्रत्येक वेळी ते ताजे तोडायचे का? याविषयी जाणून घेऊया.

ताजेच बेलपत्र आणि तुळसच देवाला अर्पण करावी का? जुनी चालत नाही का? जाणून घ्या
Follow us on

आपण देवाची पूजा करतो. पण, तुम्हाला कधी प्रश्न पडला आहे का की, आपण देवाला ताजेच फुले किंवा पाने वहावे का? की, जुनेही चालतात. आम्ही आज तुम्हाला याचविषयी माहिती सांगणार आहोत. विशेष म्हणजे तुम्हाला हे वाचून आश्चर्य वाटेल पण बेलाची पाने ही 5 दिवस ताजी असतात. त्यामुळे तुम्ही आधी तोडून ठेवलेली पाने वाहू शकतात.

प्राचीन काळापासून देवाला फुले आणि पाने अर्पण करण्याची परंपरा आहे. सनातन धर्मात अनेक वृक्ष-वनस्पती व फुले यांना देव मानले आहे. उदाहरणार्थ, घराच्या अंगणात असलेले तुळशीचे झाड ही केवळ वनस्पती नसून ती स्वतःच देवतुल्य मानली जाते.

त्याचबरोबर बेलपत्राशिवाय भगवान शंकराची पूजा अपूर्ण मानली जाते. म्हणूनच प्रत्येक शिवरात्रीला बेलपत्र आणि धोतऱ्याचं फुल हे भक्त शिवलिंगावर अवश्य अर्पण करतात. सामान्य दिवसातही प्रतिदिनच्या पूजेत लोक देवाला फुले अर्पण करतात. पण अशा वेळी प्रश्न पडतो की. दरवेळी देवाच्या पूजेत ताजी फुलेच अर्पण करता येतात का? तुळशी किंवा बेलपत्र देवाला अर्पण करायचे असेल तर प्रत्येक वेळी ते ताजे तोडायचे का? देवाच्या उपासनेत फुलांविषयी शास्त्रीय पद्धत जाणून घ्या.

हे सुद्धा वाचा

तुळशीची मंजुळा काढून 7 दिवस देवाला अर्पण करा, ती ताजी मानली जाते. रविवारी तुळस तोडली जात नाही. अशावेळी तुम्ही तुळशीजींची मंजुळा आधीच मोडून काढू शकता, हे फ्रेश मानले जात आहे.

बेलपत्र 5 दिवस ताजे मानले जाते, म्हणजेच 5 दिवस बेलपत्र तोडून भगवान शंकराला अर्पण करू शकता. ते ताजे मानले जाईल. त्याचबरोबर भगवान विष्णू आणि माता लक्ष्मीला अर्पण केलेले कमळाचे फूल 3 दिवस ताजे मानले जाते. याशिवाय इतर सर्व फुले 1 दिवस ताजी मानली जातात. म्हणजेच रोज सकाळी फुले उचलणे तुम्हाला शक्य नसेल तर तुम्ही एक दिवस अगोदर फुले तोडू शकता किंवा मागवू शकता आणि सकाळच्या पूजेत त्यांचा वापर करू शकता. ते ताजे मानले जातात.

देवाची सेवा करणाऱ्यांसाठी ही माहिती अतिशय लाभदायक आहे. कारण, आपण रोज फुले तोडण्याची गरज नाही. त्यामुळे झाडावर देखील फुले जास्त काळ राहतात. आम्ही तुम्हाला वर सांगितलेल्या नियमाप्रमाणे पालन केल्यास तुम्हाला याचा फायदा होऊ शकतो.

(डिस्क्लेमर: वरील माहिती उपलब्ध स्रोतावरून देण्यात आलेली आहे. याच्या तथ्यांबद्दल आम्ही कुठलाही दावा करीत नाही, तसेच अंधश्रद्धेला दुजोरा देत नाही)