मुंबई : हिरा जगातील सर्वात मौल्यवान रत्नांपैकी एक आहे. मान्यता आहे की हिरा स्त्रियांचा सर्वात आवडता अलंकार आहे. हे स्त्रियांच्या अगदी जवळचे मानले जाते. हिऱ्याचा संबंध थेट शुक्र ग्रहाशी आहे. ज्योतिष शास्त्रामध्ये शुक्र ग्रह हा भौतिक सुखसोयींचा कारक मानला जातो. जरी अनेक लोकांसाठी हिरा खूप फायदेशीर ठरला असेल, तरी हिरा परिधान केल्यावर बरेच लोक अस्वस्थ होतात. त्यांच्या आयुष्यात अनेक अडथळे येतात. अशा परिस्थितीत हिरा हा काहींसाठी वरदान ठरतो आणि काहींसाठी तो हानिकारक असल्याचे सिद्ध होतो (Which Zodiac Signs should wear Diamond and which should not wear).
म्हणून, हिरा घालण्यापूर्वी ज्योतिषीय सल्ला घेतला जातो. ज्योतिषानुसार काही विशिष्ट परिस्थितीतच हिरा घालता येतो. जाणून घेऊया हिऱ्याबाबत सर्वकाही –
शुक्र ग्रहाला बळकट करण्यासाठी हिरा परिधान केला जातो. जर हिरा तुम्हाला सुट झाला तर आयुष्यात सुविधांची कमतरता कधीही भासणार नाही.
हिरा परिधान केल्याने आत्मविश्वास बळकट होतो. प्रेम संबंधांमध्ये गोडवा वाढतो. नाती मजबूत होतात.
हिरे विवाहित जीवनासाठी खूप चांगले मानले जातात.
ज्योतिषशास्त्रानुसार कला, माध्यम, चित्रपट किंवा फॅशनशी संबंधित लोकांसाठी हिरा परिधान करणे अत्यंत शुभकारक सिद्ध होऊ शकते.
हिरा घालण्यापूर्वी नक्कीच ज्योतिषविषयक सल्ला घ्या. ते स्वतः घालू नका.
मान्यता आहे की वृषभ, मिथुन, कन्या, मकर, तूळ आणि कुंभ राशीत जन्मलेल्या लोकांसाठी हिरा खूप शुभ मानला जातो.
ज्योतिष शास्त्रानुसार वृषभ आणि तूळ राशीच्या व्यक्तींसाठी हिरा खूप चांगला असतो.
दुसरीकडे, मेष, सिंह, वृश्चिक, धनू आणि मीन राशीच्या लोकांसाठी हिरा अजिबात शुभ नाही.
ज्योतिषशास्त्रानुसार वृश्चिक राशीच्या व्यक्तींनी चुकूनही हिरा घालू नये.
जर आपण फॅशन म्हणून देखील हिरा परिधान करत असाल, तरी ज्योतिषाचा सल्ला नक्की घ्या.
जोडीदाराशी सतत लहान-लहान गोष्टींवरुन वाद होत असतील तर हे 5 ज्योतिषीय उपाय कराhttps://t.co/xz76baZf3y#Couple #couplefight #AstroTips
— TV9 Marathi (@TV9Marathi) July 9, 2021
Which Zodiac Signs should wear Diamond and which should not wear
टीप – या लेखात देण्यात आलेली माहिती, सूचना आणि मान्यता ही उपलब्ध सामान्य माहितीवर आधारित आहे. कुठलाही उपाय करण्यापूर्वी ज्योतिष विषयातील जाणकारांशी संपर्क करा…
संबंधित बातम्या :
15 जुलैनंतर पुढील चार महिने लग्नाचा एकही मुहूर्त नाही, जाणून घ्या पुढील शुभ मुहूर्त कधी
Ashadha Amavasya 2021 | जर कुंडलीत पितृ दोष असेल तर अमावस्येला ही झाडं लावा…