शीख धर्माची स्थापना गुरू नानक (Guru Nanak) यांनी सोळाव्या शतकात पंजाबमध्ये (Punjab) केली. जगभरात एकूण दोन कोटी शीख राहतात. त्यातील बहुतांश पंजाबमध्ये राहतात. ब्रिटनमध्येही जवळपास पाच लाख शीख (Sikh) वास्तव्य करतात. शीख हा शब्द मुळ संस्कृतमधुन आला आहे. त्याचा अर्थ होतो शिष्य. शीख हे एकेश्वरवादी आहेत. ते देवाला ‘वाहे गुरू’ म्हणतात. तो अकाल व निरंकार आहे असे ते मानतात. धार्मिक कार्य करत बसण्यापेक्षा चांगले कृत्य करण्याला ते प्राधान्य देतात. शीख हा जगातला पाचवा सर्वांत मोठा धर्म आहे. गुरू ग्रंथसाहिब हा शीखांचा धर्मग्रंथ आहे. शीखांचे एकूण दहा गुरू आहेत. त्यातील पहिले गुरू नानक. त्यांच्यानंतर नऊ गुरू झाले.
दहावे गुरू गोविंदसिंग यांनी आपल्या अनुयायांना सांगितले की माझ्या मृत्यूनंतर गुरू ग्रंथ साहिबा यालाच आपले गुरू माना व त्यात सांगितल्याप्रमाणे आचरण करा. त्यामुळे पुढे गुरूंची परंपरा बंद झाली. गुरू गोविंदसिंग यांनी 1699 मध्ये खालसा पंथाची स्थापना केली. या पंथाचे स्वरूप लढाऊ होते कारण अर्थातच त्यावेळचे राजकीय वातावरण. त्यावेळी समाजबांधवांना शिस्तीच्या एका धाग्यात बांधण्यासाठी पाच ककारांची निर्मिती त्यांनी केली. या पाच ककारमध्ये ‘कडे’ एक आहे म्हणून शीख बांधव कडा घालतात.
1. केस (हे केस कधीच कापायचे नाहीत.)
2.कडे (स्टीलचे)
3.कंगवा (लाकडापासून बनलेला)
4.कच्छा (सूती विजार)
5.कृपाण (एक प्रकारचा चाकू)
कडे हा दागिना म्हणून वापरत नसल्यामुळे ते सोन्याचांदीऐवजी स्टीलचे असावे. या कड्यामुळे गुरूशी एकनिष्ठ राहता येते. कोणतेही धर्मविरोधी काम करणार नाही याची सतत आठवण राहण्याचे काम कडे करते. शीख लोकांच्या हातातील ‘कडे ‘ हे विनयाचे व संयमाचे प्रतिक आहे . देवाला सुरूवात नाही व शेवटही नाही याचे कडे हे प्रतीक मानले जाते. याशिवाय एक शीख उजव्याच हातात फक्त एकच कडे घालू शकतो असाही नियम आहे. कठीण प्रसंगांचा सामना करण्यासाठी हे कडे एक विशिष्ट ऊर्जा देते व कडे घातलेला व्यक्तीला कोणतेही भय नसते असे शीख धर्मात मानले जाते.
देवाला हदयात ठेवा
प्रामाणिकपणे जगा व भरपूर कष्ट करा
सर्वांशी समान वागा
दुसरयांची सेवा करा
दैवावर जास्त विश्वास ठेऊ नका.
इतर बातम्या :