पीठ मळल्यानंतर त्यावर बोटांचे ठसे का उमटवतात? यामागील शास्त्रीय कारण आणि परंपरा माहितीये?

| Updated on: Mar 28, 2025 | 7:21 PM

पीठ मळल्यानंतर बोटांचे ठसे उमटवण्याचा सल्ला का दिला जातो. काय आहे यामागील शास्त्रीय कारण माहितीये का? चला जाणून घेऊयात यामागचं नेमकं शास्त्रीय कारण काय आहे ते?

पीठ मळल्यानंतर त्यावर बोटांचे ठसे का उमटवतात? यामागील शास्त्रीय कारण आणि परंपरा माहितीये?
Why Do We Imprint Dough? Ancient Tradition & Scientific Reasons
Image Credit source: tv9 marathi
Follow us on

घरातील वडीलधाऱ्यांनी सांगितलेल्या गोष्टी आपल्याला समजणे काहीवेळेला थोडे कठीण असते, विशेषतः जेव्हा आपण त्यांच्याकडे फक्त एक जुन्या परंपरा किंवा श्रद्धा म्हणून पाहतो. पण जेव्हा आपण त्यांना खोलवर समजून घेतो तेव्हा आपल्याला लक्षात येते की या गोष्टींच्या मागे काही विशिष्ट कारणे आणि तर्क आहेत. त्यातील एक परंपरा किंवा पद्धत म्हटली तर, “पीठ मळल्यानंतर त्यावर बोटांचे ठसे उमटवतात”, या मागील कारण तुम्हाला माहिती आहे का? lms; याबाबत शास्त्रांमध्ये काय सांगितलं आहे. चला पाहुयात.

स्वयंपाकघरात प्रत्येक गोष्ट काळजीपूर्वक करण्याचा सल्ला दिला जातो

पीठ मळणे हे आपल्या दैनंदिन जीवनात एक सामान्य काम. परंतु या सामान्य कामाचेही काही विशेष महत्त्व आहे. विशेषतः घरातील महिला दिवसातून अनेक वेळा पीठ मळतात, ज्यापासून रोट्या, पराठे, चपाती तयार केले जातात. परंतु याबाबत शास्त्रांमध्ये काही विशेष सूचना देण्यात आल्या आहेत, कारण हे कार्य केवळ अन्न तयार करण्याशी संबंधित नाही तर ते आपल्या मानसिकतेशी आणि भक्तीशी देखील संबंधित आहे असं मानलं जातं. हिंदू धर्मात, अन्न हे केवळ आहार नाही तर एक प्रकारचा प्रसाद मानला जातो आणि म्हणूनच स्वयंपाकघरात प्रत्येक गोष्ट काळजीपूर्वक करण्याचा सल्ला दिला जातो.

पीठ मळल्यानंतर बोटांचे ठसे उमटवण्याचा सल्ला का दिला जातो?

पीठ मळल्यानंतर बोटांचे ठसे उमटवण्याचा सल्ला दिला जातो. ही फक्त एक प्रथा आहे . खरं तर, यामागील कारण धर्मग्रंथांमध्ये आणि जुन्या समजुतींमध्ये लपलेले आहे. आपल्या पूर्वजांच्या मते, पिंडदान हे पूर्वजांच्या आत्म्याच्या शांतीसाठी केले जाते. पिंड तांदळाच्या पिठापासून बनवला जातो आणि त्याचा आकार गोल असतो. पीठ मळल्यानंतर, तयार होणारा गोल आकार पिंड मानला जातो. या म्हणजे पूर्वजांना दाखवण्यात येणारा नैवेद्य.

अशा कणकेपासून चपाती बनवणे शुभ मानले जात नाही

अशा कणकेपासून चपाती बनवणे शुभ मानले जात नाही. म्हणून पिठ मळल्यानंतर त्यावर बोटांचे ठसे उमटवणे आवश्यक मानले जाते. जेणेकरून ते ‘पिंड’ म्हणून दिसू नये. म्हणून पीठ मळल्यानंतर बोटांचे ठसे उमटवण्याचा सल्ला दिला जातो.