मुंबई : देवाची उपासना करण्याला आणि त्याची पूजा करण्याला हिंदी धर्मात विशेष महत्त्व आहे, यामागचे महत्त्वाचे कारण म्हणजे माणूस सदाचार आणि धार्मिकतेकडे जातो आणि वाईट कर्मांपासून दूर राहातो. कुठलीही विशेष पुजा करताना जेव्हा तुम्ही शेवटी आरती करता तेव्हाच पूजा पूर्ण होते. आरती करण्याही योग्य पद्धत आहे. आरती म्हणजे देवाची स्तूती करणे. शास्त्रोक्त पद्धतीने आरती केल्याने चांगले परिणाम मिळतात प्राप्त होतात, तसेच पूजेदरम्यान काही उणिवा किंवा चुका राहिल्यास क्षमाही होते. धर्मग्रंथातील आरतीच्या वर्णनात, एका संस्कृत श्लोकात असे म्हटले आहे की, मंत्राशिवाय आणि कोणत्याही कृतीशिवाय, म्हणजेच आवश्यक कर्मकांड न करता पूजा केल्यानंतर आरती (Aarti Rules) केल्यास त्यात पूर्णता प्राप्त होते.
1. एक, पाच, सात किंवा विषम संख्येने दीप लावून आरती करावी. साधारणपणे एक किंवा पाच दिवे लावून आरती केली जाते.
2. आपल्या आवडत्या देवतेची स्तुती जप करण्याबरोबरच, त्यांच्या मंत्रांचाही आरतीमध्ये समावेश आहे.
3. आरतीचे करताना, भक्त मंत्राच्या शब्दांचा आकार बनवून आरती फिरवतो, परंतु जर मंत्र मोठा आणि कठीण असेल तर तसे करणे शक्य नाही.
4. या समस्येवर उपाय सांगताना आपल्या ऋषींनी ओमचा आकार बनवण्याविषयी सांगितले आहे. ऋषी म्हणतात की प्रत्येक मंत्राची सुरुवात ओम या शब्दाने होते.
5. भक्ताने हातात धरलेली आरती अशा प्रकारे फिरवावी की ओमचा आकार तयार होईल.
6. अशाप्रकारे आरती करताना भगवंताच्या गुणांचा जप करण्याबरोबरच मंत्रांचाही जप करावा लागतो.
7. दिव्याच्या ज्योतीची दिशा पूर्व दिशेला ठेवल्याने आयुर्मान वाढते, पश्चिम दिशेला ठेवल्याने दुःख वाढते, दक्षिण दिशेला ठेवल्याने नुकसान होते आणि ज्योत उत्तर दिशेला ठेवल्याने आर्थिक लाभ होतो.
(वरील माहिती उपलब्ध स्रोतावरून देण्यात आलेली आहे.याच्या तथ्यांबद्दल आम्ही कुठलाही दावा करीत नाही, तसेच अंधश्रद्धेला दुजोरा देत नाही)