लग्नात नवरीला का लावली जाते मेहंदी? 99 टक्के लोकांना नाही माहिती यामागचे कारण

| Updated on: May 09, 2023 | 2:05 PM

लग्नात मेंदी लावण्याच्या विधीला धार्मिक आणि सामाजिक महत्त्व आहे. याशिवाय मेहंदीला सौंदर्य आणि सौभाग्याचे प्रतीक मानले जाते. या विधीमुळे वधूला तेज येते आणि तिचे सौंदर्य वाढते. मात्र याशिवाय आणखीही काही महत्त्वाचे कारण आहे.

लग्नात नवरीला का लावली जाते मेहंदी? 99 टक्के लोकांना नाही माहिती यामागचे कारण
मेहेंदी
Image Credit source: Social Media
Follow us on

मुंबई : भारतीय संस्कृतीत विवाहाला विशेष स्थान देण्यात आले आहे. भारतातील विवाह हा एका सामाजिक सणासारखा आहे ज्यामध्ये मुलगा आणि वेगवेगळ्या परंपरा आणि विधींचे पालन करून सहजीवनाला सुरूवात करतात. लग्नाच्या या विधींपैकी एक म्हणजे मेहंदी, ज्यामध्ये ती वधू आणि वरच्या हातांवर आणि पायावर लावली जाते. लग्नात मेहंदी (Importance of Mehendi)  लावण्याची प्रथा बहुतांश राज्यांमध्ये प्रचलित आहे. लग्नाच्या काही दिवस आधी हा विधी केला जातो. यामध्ये वधूच्या हातावर आणि पायावर मेहंदी लावून सुंदर डिझाइन्स बनवल्या जातात. हा विधी वधू आणि वरच्या कुटुंबातील सदस्य आणि मित्रांद्वारे केला जातो.

मेहंदीच्या विधीला इतके महत्त्व का?

लग्नात मेंदी लावण्याच्या विधीला धार्मिक आणि सामाजिक महत्त्व आहे. याशिवाय मेहंदीला सौंदर्य आणि सौभाग्याचे प्रतीक मानले जाते. या विधीमुळे वधूला तेज येते आणि तिचे सौंदर्य वाढते.  हिंदू धर्मात 16 अलंकारांचा उल्लेख आहे, ज्यामध्ये मेहंदी देखील समाविष्ट आहे. मेहंदी वधूचे सौंदर्य वाढवण्याचे काम करते. मेहंदी हे प्रेमाचे लक्षण मानले जाते, त्याच्या रंगाबद्दल असे म्हटले जाते की मेहंदीचा रंग जितका उजळ असेल, वधूचा जीवन साथीदार तितकेच तिच्यावर प्रेम करेल. मेहंदीचा चमकदार रंग वधू आणि वरांसाठी खूप भाग्यवान आहे.

मेहंदी लावण्यामागे शास्त्रीय कारण

असे मानले जाते की लग्नाच्या वेळी वधू आणि वर या दोघांवरही खुप दडपण असते. मेहंदीची प्रकृती थंड असल्यामुळे ती शरीराचे तापमान राखून शरीराला थंडावा देते. म्हणूनच वधू-वरांना मेहंदी लावली जाते. इतकेच नाही तर मेहंदीचा उपयोग प्राचीन काळी आयुर्वेदिक औषध म्हणूनही केला जात होता.

हे सुद्धा वाचा

(वरील माहिती उपलब्ध स्रोतावरून देण्यात आलेली आहे.याच्या तथ्यांबद्दल आम्ही कुठलाही दावा करीत नाही, तसेच अंधश्रद्धेला दुजोरा देत नाही)