लग्नात अंगठीने भांगेत कुंकू का भरतात? 99 टक्के लोकांना नाही माहिती या मागचे कारण

| Updated on: Jul 08, 2023 | 10:53 AM

हिंदू धर्मात विवाह हा सोळा संस्कारांपैकी एक आहे. लग्नातल्या प्रत्त्येक विधीला एक विशेष महत्त्व आहे. त्या पैकीच एक विधी म्हणजे भांगेत कुंकू भरण्याच्या विधी आहे.

लग्नात अंगठीने भांगेत कुंकू का भरतात? 99 टक्के लोकांना नाही माहिती या मागचे कारण
विवाह विधी
Image Credit source: Social Media
Follow us on

मुंबई : हिंदू धर्मात महिलांनी भांगेत लावलेले कुंकू हे सौभाग्याचे लक्षण मानले जाते. हे लग्नाचे प्रतीक आहे. लग्नाच्या विधीत भागेत कुंकू भरण्याच्या  विधीला विशेष महत्त्व आहे. या विधी शिवाय लग्न अपूर्ण मानल्या जाते. लग्नात अंगठीने भांगेत कुंकू भरण्याचा विधी (Hindu Vivah vidhi) आपण सगळ्यांनी पाहिला असेल. शास्त्रानुसार या प्रथेचे मानवी जीवनात खूप महत्त्व आहे. हिंदू धर्मात अंगठीत कुंकू भरणे सौभाग्य वाढवणारे मानले जाते. अंगठीला कुंकू लावण्याचे अनेक प्रतीकात्मक अर्थ आहेत. अंगठी पतीचे पत्नीप्रती असलेले प्रेम आणि वचनबद्धता दर्शवते.

अंगठीने भांगेत शेंदूर लावण्याचे महत्त्व

वराने वधूच्या भांगेत कुंकू लावण्याचा प्रतीकात्मक अर्थ आहे, त्याचप्रमाणे अंगठीने भांगेत कुंकू भरण्याचे इतरही अनेक फायदे आहेत. शास्त्रानुसार कुंकवाचा लाल रंग वाईट शक्तींना जीवनापासून दूर ठेवतो. अंगठी पत्नीच्या आरोग्याचे रक्षण करते. हिंदू धर्मात अंगठीने भांग भरण्याची प्रथा अनेक शतके जुनी आहे. जी आजही हिंदू संस्कृतींमध्ये मोठ्या प्रमाणावर प्रचलित आहे. हे प्रेम, वचनबद्धता आणि सुरक्षिततेचे प्रतीक आहे आणि  महिलांना त्यांची ओळख दाखवण्याचा हा एक मार्ग आहे.

वैवाहिक जीवनातील प्रेम दर्शवते अंगठी

लग्नादरम्यान, जेव्हा अंगठीने भांगेत कुंकू भरले जाते तेव्हा ते पतीचे आपल्या पत्नीबद्दलचे प्रेम दर्शवते. अंगठी हे वैवाहिक जीवनातील अतूट प्रेमाचे लक्षण मानले जाते. अंगठीला कुंकू लावून, पती पत्नीला वचन देतो की तो तिच्यावर नेहमीच प्रेम करेल आणि तिला कोणत्याही परिस्थितीत एकटे सोडणार नाही.

हे सुद्धा वाचा

शुभ आणि सौभाग्याचे प्रतीक

कुंकू हे हिंदू धर्मातील विवाहित स्त्रीसाठी सौभाग्य आणि समृद्धीचे प्रतीक आहे. लग्नात वर जेव्हा वधूच्या अनामिका बोटावर कुंकू लावतो तेव्हा ते जीवनात शुभ आणि सौभाग्य आणते. असे मानले जाते की हे नवविवाहित जोडप्याच्या जीवनात आशीर्वाद आणि सकारात्मक ऊर्जा आणते. ज्यामुळे सुखी आणि समृद्ध वैवाहिक जीवन सुरू होते.

अंगठीला कुंकू लावण्याचे आहे धार्मिक महत्त्व

हिंदू धर्मात लाल रंग अतिशय शुभ मानला जातो. लाल रंगाचा वापर अनेक देवता आणि धार्मिक विधींमध्ये केला जातो. विवाहामध्ये वधू-वरांना भगवान विष्णू आणि देवी लक्ष्मीचे रूप मानले जाते. म्हणूनच सोन्याच्या अंगठीत सिंदूर भरून जीवनात सुसंवादाची इच्छा केली जाते.

संपत्ती आणि समृद्धीचा आशीर्वाद

लग्नात सोन्याच्या अंगठीचा वापर धन आणि समृद्धीचे प्रतीक आहे. मान्यतेनुसार, सोन्याच्या अंगठीला कुंकू लावल्याने दाम्पत्याच्या जीवनात आर्थिक स्थैर्य आणि समृद्धी येते. हे मौल्यवान वस्तूंच्या देवाणघेवाणीचे प्रतीक आहे आणि जोडप्यामधील प्रेम, आदर आणि वचनबद्धतेचे प्रतीक म्हणून देखील कार्य करते.

(वरील माहिती उपलब्ध स्रोतावरून देण्यात आलेली आहे.याच्या तथ्यांबद्दल आम्ही कुठलाही दावा करीत नाही, तसेच अंधश्रद्धेला दुजोरा देत नाही)