धीरेंद्र शास्त्रींच्या चेहऱ्यावर महिलेने फेकले नारळ, रात्रभर राहिले चिंतेत म्हणाले, ‘ही सुरक्षा…’

| Updated on: Aug 27, 2024 | 4:17 PM

Bageshwar Dham Sarkar Dhirendra Krishna Shastri: बागेश्वर धामचे पीठाधीश्वर धीरेंद्र कृष्ण शास्त्री हे देशातील सर्वात लोकप्रिय धार्मिक बाबांपैकी एक आहेत. जे त्यांच्या दैवी शक्तींसाठी ओळखले जातात. धीरेंद्र कृष्ण शास्त्री यांना वाय सुरक्षा मिळाली आहे. पण अलीकडेच एका महिलेने त्याच्यावर नारळ फेकून मारल्याची घटना त्यांनी सांगितली.

धीरेंद्र शास्त्रींच्या चेहऱ्यावर महिलेने फेकले नारळ, रात्रभर राहिले चिंतेत म्हणाले, ही सुरक्षा...
Follow us on

बागेश्वर धामच्या पीठाधीश्वर धीरेंद्र कृष्ण शास्त्री सध्या खूप चर्चेत असतात. अनेक भाविक त्यांच्या प्रवचनाला गर्दी करत असतात. त्यांचे अनोखे कथाकथन लोकप्रिय झाले आहे. आज त्यांचे लाखो भाविक आहेत. अलीकडेच त्यांनी एका प्रवचनात, सांगितले की, एका भक्ताने तर त्यांना नारळ फेकून मारला होता. जो सरळ त्यांच्या नाकाला लागला. ज्यामुळे रात्रभर त्यांना त्रास झाला. बाबा बागेश्वर यांनी हा किस्सा सांगितल्यानंतर अनेक लोकांना हसू आवरले नाही. बागेश्वर धामच्या बाबांनी सांगितले की, लोकं वेगवेगळ्या गोष्टी घेऊन येतात. एकाने तर चक्क चाकूच आणला होता. अशा वेळी त्यांना सुरक्षेची गरज असते. असेही ते म्हणाले.

धीरेंद्र कृष्ण शास्त्री हे वयाच्या अवघ्या २२ व्या वर्षी पीठाधीश्वर झाले आणि त्यांचे वय आता २८ वर्षे आहे. त्यांच्या भाविकांना अशी समज आहे की, त्याच्याकडे दैवी शक्ती आहे. ते लोकांच्या समस्या न सांगता समजून जातात आणि त्याच्यावर उपाय ही सांगतात. अलीकडेच त्यांच्या एका प्रवचनात बाबा स्वतःच्या सुरक्षेची खिल्ली उडवताना दिसले होते. या व्हिडिओमध्ये धीरेंद्र शास्त्री हे बोलताना दिसत होते की, ‘एकदा एक माणूस आमच्याकडे आला आणि म्हणाला, बाबा, मला तुमचे अंगरक्षक बनायचे आहे. पण नंतर एका ठिकाणी मारामारी झाली त्यामुळे मलाच त्याला वाचवावे लागले होते.

बागेश्वर धामचे बाबा बोलता बोलता आपल्या अंगरक्षकांकडे बघू लागले आणि म्हणाले, ‘आमचे अंगरक्षक आता पळून गेले आहेत, हल्ला होईल तेव्हाच येतील.’ मंचावरूनच आपल्या सुरक्षेची खिल्ली उडवत धीरेंद्र शास्त्री म्हणाले, ‘आमची सुरक्षाही कमालीची आहे. त्यांना कशाचीच चिंता नाही. जेव्हा कोणी फुले वाहायला येते तेव्हाच ते भक्तांना दूर ढकलतात.’

ते पुढे म्हणतात, ‘त्यांना कसलीही चिंता नाही, ते फक्त जॅकेट घातलेले आहेत, काजू खात आहेत. तुम्ही त्यांना विचारले की तुमचे काम काय आहे तर ते म्हणतात की, गुरुजींची सुरक्षा आहे. y सुरक्षा आहे. भक्तांनी गुरुजींना हार घालता कामा नये.’ यानंतर ते सांगतात की हे सर्व सत्य नाही, ते खूप चांगले मुले आहेत. काही भाविकांनी फुलांचे हार अर्पण केले आणि एक साधू सुरी घेऊन आला. आता ते भक्त आहेत, त्यांना थोडेच नाकारू शकतात. आता काल एका आईने माझ्या नाकावर नारळ फेकला. रात्रभर नाक लाल राहिले. आम्ही बाम लावत राहिलो.

पंडित धीरेंद्र शास्त्री यांचा जन्म 4 जुलै 1996 रोजी छतरपूरमध्ये झाला होता. या गावात बागेश्वर बालाजींचे मंदिर आहे, ज्यांचे उपासक पंडित धीरेंद्र कृष्ण शास्त्री आहेत. याच कारणामुळे लोक धीरेंद्र शास्त्री यांना बागेश्वर बाबा या नावानेही हाक मारतात. 28 वर्षीय धीरेंद्र शास्त्री यांचे आज लाखो भक्त आहेत.