महाराष्ट्राची कुलस्वामिनी आई तुळजाभवानी मातेच्या गाभाऱ्यात आज अक्षय तृतीया निमित्त आंबा, केळी , कलिंगड या फळांची आरास करण्यात आली. प्रसन्न वातावरणाने गाभारा फुलून गेला.
अक्षय तृतीया मंगळवारी आल्याने देशभरातून तुळजाभवानी देवी भक्तांनी तुळजाभवानी देवीच्या दर्शनासाठी मोठी गर्दी केली होती. कोरोना काळानंतर दोन वर्षांनी शुभ मुहूर्तावर देवीचे दर्शन घेता येत असल्याने भाविक आनंदी होते.
साडे तीन शुभ मुहूर्तपैकी आज एक शुभ मुहूर्त असल्याने तुळजाभवानी देवीला शिवकालीन दागिन्याची विशेष अलंकार पूजा घालण्यात आली.
गाभाऱ्यात आज अक्षय तृतीया निमित्त आंबा, केळी , कलिंगड या फळांची आरास करण्यात आली.
देवीला आज छत्रपती शिवाजी महाराज यांच्यासह अन्य राजे राजवाडे यांनी दिलेले पुरातन दागिने, माणिक, हिरे, पाचू असलेली मोत्याची माळ असे दागिने घालण्यात आले.