Neeraj Chopra : पाकिस्तानच्या अर्शद नदीमने चीटिंग करुन नीरज चोप्राला हरवलं का? गोल्ड जिंकल्यानंतर मोठा वाद

| Updated on: Aug 09, 2024 | 9:32 AM

Neeraj Chopra : पाकिस्तानचा जॅवलिन थ्रोअर अर्शद नदीमने काल सर्वांनाच थक्क केलं. त्याने अचाट कामगिरी केली. पॅरिस ऑलिम्पिक 2024 स्पर्धेत त्याने जॅवलिन थ्रो मध्ये थेट सुवर्ण पदकाला गवसणी घातली. या स्पर्धेत त्याने भारताच्या नीरज चोप्राला मागे सोडलं. खरंतर नीरज चोप्रा सुवर्ण पदक जिंकणार असा सर्वांना विश्वास होता. अर्शदच्या या प्रदर्शनानंतर आता त्याच्यावर चीटिंगचे आरोप होत आहेत.

Neeraj Chopra  : पाकिस्तानच्या अर्शद नदीमने चीटिंग करुन नीरज चोप्राला हरवलं का? गोल्ड जिंकल्यानंतर मोठा वाद
Arshad Nadeem-Neeraj Chopra
Image Credit source: PTI
Follow us on

पॅरिस ऑलिम्पिक 2024 स्पर्धेत पाकिस्तानच्या अर्शद नदीमने दमदार प्रदर्शन केलं. जॅवलिन थ्रो म्हणजे भालाफेकीच्या फायनलमध्ये आपल्या अचाट कामगिरीने त्याने सगळ्यांना थक्क केलं. पाकिस्तानचा अर्शद असं प्रदर्शन करेल, अशी कोणी अपेक्षा केली नव्हती. पॅरिसमध्ये जॅवलिन थ्रो च्या रोमांचक फायनलमध्ये त्याने 92.97 मीटर अंतरावर थ्रो करुन नवीन ऑलिम्पिक रेकॉर्ड रचला. नीरज चोप्राने 89.45 मीटर अंतरावर थ्रो करुन रौप्य पदकाला गवसणी घातली. पाकिस्तानचा जॅविलन थ्रोअर अर्शद नदीमने सुवर्ण पदक जिंकल्यानंतर आता त्याच्यावर चीटिंगचे आरोप होत आहेत. त्याने गोल्ड मेडल जिंकल्यानंतर वाद वाढला आहे. अर्शद नदीमची डोप टेस्ट करण्याची मागणी होत आहे.

नीरज चोप्राचा सर्वात मोठा स्पर्धक अर्शद नदीमने पॅरिस ऑलिम्पिकमध्ये थक्क करणारं प्रदर्शन केलय. जॅवलिन थ्रो च्या फायनलमध्ये अर्शदने 6 वेळा भालाफेकीचा प्रयत्न केला. पहिला थ्रो त्याचा फाऊल होता. दुसऱ्या थ्रो मध्ये त्याने सर्वांनाच आश्चर्याचा धक्का दिला. अर्शदने दुसऱ्या प्रयत्नात 92.97 मीटर इतक्या दूर अंतरावर भाला फेकला. अशी कामगिरी करताना त्याने 16 वर्षापूर्वी 2008 बीजिंग ऑलिम्पिकमधला रेकॉर्ड मोडला. भालाफेकीत ऑलिम्पिक रेकॉर्ड नॉर्वेच्या एंड्रियास थॉरकिल्डसन यांच्या नावावर होता. त्यांनी 2008 मध्ये 90.57 मीटर अंतरावर थ्रो केलेला. अर्शद नदीमने त्यानंतर 4 प्रयत्न केले. त्याने पुन्हा एकदा 92 मीटर अंतर पार केलं. त्याच्या या कामगिरीवर कोणाला विश्वास बसत नाहीय. म्हणून अनेक फॅन्सनी अर्शद नदीमवर ड्रग्स घेऊन मैदानात उतरल्याचा आरोप केला आहे. त्याच्या डोप टेस्टची मागणी होत आहे.


अर्शद नदीमने आणखी कुठले रेकॉर्ड मोडले?

अर्शद नदीमने फक्त ऑलिम्पिक रेकॉर्ड मोडला नाही, तर त्याने आशियाई रेकॉर्ड सुद्धा मोडला. त्याच्याआधी तैवानच्या चाओ त्सुन चेंगने 91.36 मीटर अंतरावर थ्रो केला होता. 31 वर्षानंतर अर्शदने हा रेकॉर्ड मोडला. इतकच नाही पाकिस्तानसाठी व्यक्तीगत इवेंटमध्ये गोल्ड मेडल जिंकणारा अर्शद नदीम पहिला खेळाडू ठरला आहे. पाकिस्तानला ऑलिम्पिकमध्ये आतापर्यंत 3 व्यक्तीगत मेडल्स मिळाली आहेत. अर्शदने मागच्या 32 वर्षापासूनची पाकिस्तानची ऑलिम्पिक मेडलची प्रतिक्षा संपवली. याआधी 1992 साली पाकिस्तानला बार्सिलोन ऑलिम्पिकमध्ये शेवटच ब्रॉन्झ मेडल मिळालं होतं.