भारत-ऑस्ट्रेलियामध्ये बॉर्डर-गावस्कर ट्रॉफी अंतर्गत पाच टेस्ट मॅचची सीरीज सुरु आहे. चौथा सामना मेलबर्नमध्ये झाला. हा कसोटी सामना ऑस्ट्रेलियाने 184 धावांनी जिंकला. यजमान ऑस्ट्रेलिया आता या सीरीजमध्ये 2-1 ने पुढे आहे. टीम इंडियाला विजयासाठी 340 धावांच टार्गेट मिळालं होतं. या पराभवानंतर रोहित शर्मा आणि विराट कोहलीच्या रिटायरमेंटच्या चर्चा जोरात सुरु आहेत. रोहित शर्मा सिडनी कसोटीनंतर निवृत्ती स्वीकारेल असही काही रिपोर्ट्समध्ये म्हटलं आहे. या दरम्यान टीम इंडियाचे माजी कर्णधार सुनील गावस्कर यांनी रोहित आणि विराटच्या निवृत्ती संदर्भात मोठ स्टेटमेंट केलं आहे. ‘या सीरीजनंतर मी रोहित शर्माला टेस्ट क्रिकेटमध्ये पाहत नाही’ असं गावस्कर सरळ बोलले.
“दोघांनी न्यूझीलंड विरुद्ध मालिकेत धावा केल्या नाहीत. इथेही धावा केल्या नाहीत. कोहलीने एक शतक जरुर झळकवलय. पण त्या मॅचमध्ये कोहली फलंदाजीला आला, तेव्हा भारत मजबूत स्थितीत होता” असं रोहित-विराटच्या खराब फॉर्मबद्दल गावस्कर म्हणाले. “एडिलेड, ब्रिस्बेनमध्ये कठीण स्थिती होती. तिथे धावांची आवश्यकता असताना दोघांनी रन्स केल्या नाहीत. दोघेही भारताचे अनुभवी खेळाडू आहेत. त्यांच्यावर बरच काही अवलंबून होतं. पण त्यांच्याकडून ते झालं नाही” असं गावस्कर म्हणाले. “यशस्वी जैस्वाल सुद्धा एडिलेड आणि ब्रिस्बेनमध्ये लवकर आऊट झाला. त्यामुळे बाकी फलंदाजांवर दबाव आला, ते तो झेलू शकले नाहीत” असं गावस्कर म्हणाले.
सिडनी टेस्ट रोहितचा शेवटचा कसोटी सामना असेल का?
सिडनी टेस्ट रोहितचा शेवटचा कसोटी सामना असेल का? या प्रश्नावर गावस्कर म्हणाले की, “त्याने धावा केल्या नाहीत, तर नक्कीच असू शकतो. कारण या पराभवासह वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशिपच्या फायनलमध्ये पोहोचाण्याची शक्यता कमी झाली आहे” “WTC चा पुढचा सीजन (2025-27) जून इंग्लंड दौऱ्यापासून सुरु होईल. त्यावेळी 2027 साठी तुम्हाला नवीन चेहऱ्यांची अपेक्षा असेल. 2027 च्या फायनलसाठी ते उपलब्ध असतील, त्यांना इंग्लंड दौऱ्यावर नेण्याची तुमची इच्छा असेल” असं गावस्कर म्हणाले.
उपचार करावे लागतील
“रोहित शर्मा आणि विराट कोहलीने आपला फॉर्म आणि टेक्निक सुधारली नाही, तर त्यांच्यावर उपचार करावे लागतील. ज्या पद्धतीने रोहित आणि कोहली आऊट होत आहेत, त्यावरुन असं वाटतय की, दुसरा काही विषय असेल, तर उपचार करावे लागतील” असं गावस्कर म्हणाले.