Gautam Gambhir : गौतम गंभीर भारतात परत येतोय, पर्थ टेस्ट जिंकल्यानंतर अचानक काय घडलं?

| Updated on: Nov 26, 2024 | 9:33 AM

Gautam Gambhir : पर्थ टेस्टमधील दणदणीत विजयानंतर आता ऑस्ट्रेलियातून एक मोठी बातमी समोर येतेय. टीम इंडियाचे हेड कोच गौतम गंभीर यांच्याशी संबंधित ही बातमी आहे.

Gautam Gambhir :  गौतम गंभीर भारतात परत येतोय, पर्थ टेस्ट जिंकल्यानंतर अचानक काय घडलं?
Gautam Gambhir
Image Credit source: PTI
Follow us on

पर्थ कसोटीत टीम इंडियाने दणदणीत विजय मिळवल्यानंतर आता ऑस्ट्रेलियातून एक मोठी बातमी समोर येतेय. टीम इंडियाचे हेड कोच गौतम गंभीर यांच्याशी संबंधित ही बातमी आहे. गौतम गंभीर भारतात परत येत आहेत. गौतम गंभीर रिर्टन का येत आहेत? अचानक काय घडलं? असे अनेक प्रश्न आहेत. गौतम गंभीर भारतात का परत येत आहेत? त्या मागच्या कारणांचा खुलासा झालेला नाही. पण व्यक्तीगत कारण असल्याच समजतय. आता प्रश्न हा आहे की, गंभीर भारतात परतल्यानंतर बॉर्डर-गावस्कर ट्रॉफीमध्ये टीम इंडियाचे हेड कोच कोण असतील?

भारत आणि ऑस्ट्रेलियामध्ये दुसरा कसोटी सामना पिंक बॉलने खेळला जाणार आहे. 6 ते 10 डिसेंबर दरम्यान एडिलेडमध्ये हा सामना होणार आहे. चांगली बाब ही आहे की, गौतम गंभीर पिंक बॉल टेस्ट मॅच सुरु होण्याआधी ऑस्ट्रेलियाला रवाना होतील. गौतम गंभीर यांनी भारतात परतण्याची बीसीसीआयला कल्पना दिली आहे, असं बीसीसीआयशी संबंधित सूत्राच्या हवाल्याने इंडियन एक्सप्रेसने वृत्त दिलं आहे. दुसऱ्या कसोटीआधी तो टीम इंडियाला जॉईंन करेल हे सुद्धा सांगितलय. भारतात परतण्यामागे व्यक्तीगत कारण असल्याच सांगितलं आहे.

दुसऱ्या टेस्टमध्ये असेल पिंक बॉल

पर्थमध्ये पहिला कसोटी सामना जिंकल्यानंतर टीम इंडिया आता कॅनबराला रवाना होणार आहे. 27 नोव्हेंबरला टीम इंडिया कॅनबराला जाईल. तिथे सरावासाठी दोन दिवसीय पिंक बॉलने मॅच खेळायची आहे. हा सामना शनिवारपासून सुरु होईल. गौतम गंभीर यांच्या अनुपस्थितीत सहाय्यक कोच अभिषेक नायर, बॉलिंग कोच मॉर्ने मॉर्केल, फिल्डिंग कोच टी. दिलीप ट्रेनिंग सेशनवर नजर ठेवतील.

व्यक्तीगत कारणामुळे रोहित सुद्धा बाहेर होता

भारतीय कॅप्टन रोहित शर्मा सुद्धा व्यक्तीगत कारणांमुळे पहिल्या कसोटी सामन्यात खेळला नव्हता. तो ऑस्ट्रेलियात पोहोचू शकला नव्हता. पण दुसऱ्या कसोटी सामन्यापासून रोहित शर्मा उपलब्ध आहे. रोहितच हे व्यक्तीगत कारण त्याच्या दुसऱ्या बाळाच्या जन्माशी संबंधित होतं. आता रोहित शर्मा ऑस्ट्रेलियात पोहोचला आहे. त्याने पिंक बॉलने सराव सुरु केला आहे. दुसऱ्या टेस्ट मॅचआधी गौतम गंभीर पोहोचल्यानंतर पुन्हा एकदा टीमचा आत्मविश्वास वाढेल.