आयपीएलमध्ये 10 टीम खळवण्याचं स्पप्न अर्धवटच राहणार का? असा सवाल आता उपस्थित राहू लागलाय. कारण अहमदाबाद फ्रेंचाईसीशी निगडीत कंपनीचे सट्टेबाजीशी कनेक्शन असल्याचं बोललं जातं आहे. त्यामुळे आयपीएलच्या संघाना रिटेंशन टाईमही वाढवून दिला जाऊ शकतो. याबाबत अधिकृतरित्या अजून कोणतीही माहिती समोर आली नाही. बीसीसीआय काय निर्णय घेणार यावरती 10 टीम खेळणार की नाही हे ठरू शकतं.
सीवीसी कॅपिटलचे सट्टेबाजीसी कनेक्शन
अहमदाबाद संघ हा सीवीसी कॅपिटलने 5625 कोटी रुपयांना खरेदी केला आहे. मात्र अजूनही बीसीसीआयकडून लेटर ऑफ इंटेडवरती सह्या करण्यात आल्या नाहीत, या कंपनीचे युरोपत सट्टेबाजीशी कनेक्शन असल्याच्या बातम्या समोर आल्या आहेत, मात्र आम्ही कुठलेही बेकायदेशीर काम करत नसल्याचं या कंपनीकडून सांगण्यात आलंय. सीवीसी कॅपिटलच्या प्रकरणाला सॉलीसिटर जनरल तुषार मेहता यांच्याकडे पाठवण्यात आलं, त्यांनी बीसीसीआयला सकारात्मक माहिती दिल्याच्याही चर्चा आहेत. मात्र ललित मोदी यांनी या कंपनीला कडाडून विरोध केल्यानं मोठा वाद निर्माण झाला आहे.
बीसीसीआयने वकिलाकडून कायदेशीर सल्ला मागितला
बीसीसीआयने याबाबत वकिलाकडून कायदेशी सल्लाही मागितला आहे. तर दुसरीकडे लखनऊ टीमविरोधातही काही तक्रारी बीसीसीआयला प्राप्त झाल्या आहेत. लखनऊ टीमचे मालक इतर खेळाडुंना त्यांच्याकडे येण्यासाठी अमिष देऊन मोठी रक्कम ऑफर करत असल्याचा आरोपही करण्यात आलाय. त्यामुळे हा वाद आणखी वाढला आहे. 30 नोव्हेंबरपर्यंत आयपीलमधील टीमच्या रिटेंशन यादी देण्याचा वेळ आहे. हा वेळ आणखी वाढवला जाऊ शकतो. किंवा अहमदाबाद आणि लखनऊाला खेळाडुंची निवड करण्यासाठीही जास्त वेळ वाढवून दिली जाऊ शकते. त्यामुळे या प्रक्रियेला किती वेळ लागतोय हे निश्चित नसल्यानं आयपीएलमध्ये 10 टीम खेळवणं केवळ स्पप्नच राहणार का हे पाहणं महत्वाचे ठरणार आहे.