मुंबई : मुंबई क्रिकेट असोशिएशनच्या (MCA) झालेल्या निवडणुकीत पवार-शेलार (Pawar Shelar) गटाने बाजी मारली. पवार-शेलार गटाने 13 पैकी 10 जागा जिंकल्या. चुरशीच्या झालेल्या निवडणुकीत संदीप पाटील (Sandip Patil) यांचा अमोल काळे (Amol Kale) यांनी पराजय केला. अॅपेक्स कौन्सिल सदस्यपदासाठी झालेल्या निवडणुकीत शिवसेनेचे मिलिंद नार्वेकर यांना (Milind narvekar) सर्वाधिक मते मिळाली.
मुंबई क्रिकेट असोशिएशनच्या निवडणुकीत अजिंक्य नाईक (Ajinkya naik) यांची सचिव पदी निवड झाली. अजिक्य नाईक यांना 286 इतकी सर्वाधिक मतं मिळाल्याने त्याचा विजय झाला. विशेष म्हणजे अजिंक्य नाईक यांचा मोठ्या फरकाने विजय झाला आहे. प्रतिस्पर्धी मयांक खांडवाला यांना 35 आणि निल सांवंत यांना अवघी 20 मतं मिळाल्याने त्यांचा पराभव झाला.
(अध्यक्ष) अमोल काळे यांना 183 मते पडली.
(सचिव) अजिंक्य नाईक यांना 286 मते पडली
(खजिनदार) अरमान मलिक यांना 162 मते पडली
अॅपेक्स कौन्सिल सदस्यपद
मिलिंद नार्वेकर यांना 221 मते मिळाली
निलेश भोसले यांना 219 मते मिळाली
कौशिक गोडबोल यांना 205 मते मिळाली.
अभय हदाफ यांना 205 मते मिळाली.
सुरज सामंत यांना 170 मते मिळाली.
जितेंद्र आव्हाड यांना 163 मते मिळाली
मंगेश साटम यांना 157 मते मिळाली
संदीप विचार यांना 154 मते मिळाली
प्रमोद यादव यांना 152 मते मिळाली
गणेश अय्यर यांना 213 मते मिळाली.
संदीप पाटील (अध्यक्ष पद : मुंबई क्रिकेट गट)
अमोल काळे (अध्यक्ष पद : पवार-शेलार गट)
अजिंक्य नाईक ( सचिव पद : पवार शेलार गट-मुंबई क्रिकेट गट)
जितेंद्र आव्हाड (सदस्य पद : पवार-शेलार गट)
मिलिंद नार्वेकर (सदस्य पद: पवार-शेलार गट)