नवी दिल्ली : ऑस्ट्रेलियात (Australia) विश्वचषक स्पर्धा (T20 world cup 2022) सुरु झाल्यापासून जगभरातील अनेक चाहते सोशल मीडियावर चर्चा करीत आहे. उद्यापासून सेमीफायनलचे सामने सुरु होणार आहेत. सेमीफायनलमध्ये टीम इंडिया, पाकिस्तान, न्यूझिलंड, इंग्लंड या टीम पोहोचल्या आहेत. पाकिस्तानची टीम (pakistan) सेमीफायनलमध्ये पोहोचल्यापासून पाकिस्तान माजी खेळाडू एकदम खूश असल्याचे पाहायला मिळत आहे. तसेच पाकिस्तानचे दिग्गज खेळाडू टीमला सल्ला देत आहेत.
एका टीव्हीच्या शोमध्ये पाकिस्तानचा माजी गोलंदाज वसिम अक्रम हा सहभागी झाला होता. मुलाखत एकदम परखड झाली. त्यामध्ये वसिम आक्रमला अॅंकर डायरेक्ट राष्ट्रीय धोबी म्हणाला आहे. तो व्हिडीओ सोशल मीडियावर चांगला व्हायरल झाला आहे.
I love this show ???? pic.twitter.com/0fky3FYheW
— Ghumman (@emclub77) November 6, 2022
त्या व्हिडीओला आतापर्यंत अनेक चाहत्यांनी कमेंट करुन प्रश्न विचारले आहे. तसेच राष्ट्रीय धोबी का म्हणाला असं अनेक चाहत्यांनी विचारलं आहे.
ज्यावेळी चर्चा सुरु होते. त्यावेळी अॅंकर कपडे एरियलने साफ होतात का असा प्रश्न आक्रमला करतो. त्यावर आक्रम जोरात हसतो. मी मागच्या दहावर्षापासून कपडे धूत आहे. सध्या मी 56 वर्षाचा आहे असं म्हणतो. अॅंकर उत्तर ऐकून जोरात हसू लागतो आणि म्हणतो, तुम्ही तर राष्ट्रीय धोबी आहात.