मुंबई: 2004 सालची ही गोष्ट आहे. रामनिवास पंघाल आणि कृष्णा कुमारी चौथ्यांदा एका मुलीचे माता-पिता बनले. त्यांनी आपल्या मुलीच नाव अंतिम (Antim) ठेवलं. याचा अर्थ फायनल किंवा शेवट होतो. पण अंतिमला अंतिम बनायच नव्हतं. वर्ल्ड चॅम्पियनशिप (World championship) मध्ये तिने कमाल केली. ‘अंतिम’ अंडर 20 वर्ल्ड चॅम्पियन बनणारी पहिली महिला कुस्तीपटू (wrestler) बनली आहे. 17 वर्षांपूर्वी रामनिवास यांनी आपल्या चौथ्या मुलीच्या नावाबद्दल फार विचार केला नव्हता. पण आता मुलीने या नावाची इतिहासात नोंद केलीय.
अंतिमने ज्यूनियर वर्ल्ड चॅम्पियनशिप मध्ये फक्त गोल्ड मेडलच मिळवलं नाही, तर 53 किलो वजनी गटात तिने वर्चस्व गाजवलं. तिने युरोपियन चॅम्पियन ओलिविया एंडरिचवर टेक्निकल सुपरियोरिटीने विजय मिळवला. त्यानंतर एका मिनिटात जापानच्या अयाका किमुराला हरवलं. युक्रेनची नताली क्लिवचुत्सका अशी एकमेव कुस्तीपटू होती, जिने पूर्ण 6 मिनिट अंतिमला लढत दिली. पण अंतिमने तिच्याविरुद्धही विजय मिळवला. फायनल मध्ये तिने कजाकिस्तानच्या अल्टिन शगायेवाला 8-0 ने हरवून इतिहास रचला.
Antim ?? with a historic ? for India
The 17-year-old became the country first-ever U20 world champ in women’s wrestling at #WrestleSofia pic.twitter.com/YML41jkdDt
— United World Wrestling (@wrestling) August 19, 2022
स्पोर्ट्स स्टारच्या वृत्तानुसार, अंतिमच्या वडिलांना 3 मुलींनंतर मुलगा हवा होता. त्यांनी स्वत: ही गोष्ट मान्य केली. हरियाणाच्या हिसार जिल्ह्यातील भागना गावचे ते रहिवासी आहेत. त्या गावात एक प्रथा आहे, तुम्हाला भरपूर मुली असतील, तर त्यांचं नाव तुम्ही अंतिम ठेवू शकता. जेणेकरुन तुम्हाला पुन्हा मुली होणार नाहीत. मुलीच नाव ठेवताना मी त्या बद्दल फार विचार केला नव्हता, असं रामनिवास म्हणाले. तुम्हाला जास्त मुली असतील, तर सांभाळ करणं कठीण असतं. मुलीच्या लग्नाची भीती त्यांच्या मनात होती. पण रामनिवास कधी आपल्या मुलींच्या स्वप्नांच्या आड आले नाहीत. त्यांनी मुलींना पूर्णपणे पाठिंबा दिला.