मेलबर्न: अॅशेस मालिकेतील (Ashes Series) दुसऱ्या कसोटी सामन्यात दुसऱ्या दिवसाचा खेळ सुरु आहे. ऑस्ट्रेलियाने पाच विकेट गमावून ३५० धावांचा टप्पा पार केला आहे. कालच्या तुलनेत आज इंग्लिश गोलंदाज थोडे प्रभावी ठरले. आज ऑस्ट्रेलियाच्या तीन फलंदाजांना माघारी धाडण्यात इंग्लंडचे गोलंदाज यशस्वी ठरले. पण अजूनही पूर्णपणे इंग्लंडचा संघ या कसोटीवर वर्चस्व गाजवताना दिसत नाहीय. कर्णधार स्टीव स्मिथची अॅलेक्स कारी बरोबर जोडी जमली आहे. स्मिथने अर्धशतक झळकावलं आहे.
आज इंग्लंडने मार्नस लाबुशेन, ट्रेव्हिस हेड आणि कॅमरॉन ग्रीन या तिघांना बाद केले. आज सकाळी खेळाला सुरुवात झाल्यानंतर ९५ धावांवर खेळणाऱ्या मार्नस लाबुशेनने शतक पूर्ण केले. कसोटी करीयरमधील त्याचे हे सहावे शतक आहे. शतकानंतर लाबुशेन खेळट्टीवर फारवेळ टिकला नाही. रॉबिनसनने त्याला 103 धावांवर पायचीत केले. हेडला १८ धावांवर रुटने क्लीन बोल्ड केले, तर ग्रीनच्या अवघ्या 2 धावांवर स्टोक्सने यष्टया वाकवल्या.
ऑस्ट्रेलियाला मोठी धावसंख्या उभारण्यापासून रोखण्याचे इंग्लंडसमोर आव्हान आहे. आधीच इंग्लंडचा संघ मालिकेत 1-0 ने पिछाडीवर आहे. काल पहिल्या दिवसाच्या अखेरीस ऑस्ट्रेलियाने (AUS vs ENG) फक्त दोन विकेट गमावून २२१ धावा केल्या होत्या. इंग्लिशन गोलंदाज वॉर्नर-लाबुशेन जोडीसमोर निष्प्रभ ठरले होते. ब्रिस्बेनच्या पहिल्या कसोटी प्रमाणे इथेही डेविड वॉर्नर (David warner) आणि मार्नस लाबुशेनमध्ये (Marnus Labuschagne) शानदार भागीदारी झाली. दोघांनी दुसऱ्या विकेटसाठी १७२ धावांची भागीदारी केली होती. वॉर्नरचे शतक अवघ्या पाच धावांनी हुकले. त्याने ९५ धावांच्या खेळीत ११ चौकार लगावले. वॉर्नरला स्टोक्सने बाद केले.
संबंधित बातम्या:
IND VS SA: कॅप्टन कोहली २९ वर्षांपासूनची विजयाची प्रतिक्षा संपवणार, गांगुलीला विश्वास
India south Africa Tour Video : जोहान्सबर्गला जाताना विमानात विराटने इशांत शर्माला डिवचलं
विराट, गेलला जमलं नाही, ते पाकिस्तानच्या मोहम्मद रिजवानने करुन दाखवलं, बाबर म्हणाला….