मेलबर्न : टीम इंडियाविरुद्ध ऑस्ट्रेलिया यांच्यात 26 नोव्हेंबरला दुसरा कसोटी सामना खेळण्यात येणार आहे. हा सामना बॉक्सिंग डे कसोटी असणार आहे. या सामन्याआधी ऑस्ट्रेलियाला मोठा झटका बसला आहे. सलामीवीर डेव्हिड वॉर्नर आणि वेगवान गोलंदाज सीन एबॉटला दुसऱ्या कसोटी सामन्यातून बाहेर झाले आहेत. क्रिकेट ऑस्ट्रेलिया आणि आयसीसीने ट्विटद्वारे याबाबतची माहिती दिली आहे. वॉर्नर दुसऱ्या सामन्यापर्यंत दुखापतीतून सावरेल, अशी आशा ऑस्ट्रेलियाला होती. मात्र आता वॉर्नरला या बॉक्सिंग डे कसोटीला मुकावं लागलं आहे. वॉर्नरला दुखापतीमुळे पहिल्या कसोटीतही खेळता आले नव्हते. यामुळे हे दोघे खेळाडू तिसऱ्या कसोटीत संघात असतील. (aus vs ind sean abbott and david warner both are ruled out from boxing day test match )
It has been confirmed that the groin injury will keep star opener, David Warner, out of the Boxing Day Test as well ?
Will Australia stick with Matthew Wade and Joe Burns at the top of the order in Warner's absence? ?#AUSvIND pic.twitter.com/NT2Us0xbDe
— ICC (@ICC) December 23, 2020
वॉर्नरला भारताविरुद्धच्या दुसऱ्या एकदिवसीय सामन्यादरम्यान फिल्डिंग करताना दुखापत झाली होती. ज्यामुळे त्याला तात्काळ मॅचमधून बाहेर जावं लागलं होतं. तर एबॉर्टला टीम इंडियाविरोधातील सराव सामन्यात दुखापत झाली होती. मात्र एबोट या दुखापतीतून सावरला आहे. क्रिकेट ऑस्ट्रेलियाने एक प्रसिद्धीपत्रक जारी केलं आहे.
JUST IN: David Warner officially ruled out of Boxing Day Test https://t.co/eqZtOTZe1A #AUSvIND pic.twitter.com/EGxSAegNXU
— cricket.com.au (@cricketcomau) December 23, 2020
वॉर्नर आणि एबॉट हे दोघे दुखापतग्रस्त आहेत. त्यामुळे या दोघांनी बायो बबलच्या बाहेर काही वेळ घालवला. हे दोन्ही खेळाडू कोरोना हॉट्स्पॉटमध्ये नव्हते. तरी ही इतर खेळाडूंच्या सुरक्षिततेच्या दृष्टीने आणि नियमांनुसार या दोघांना संघात समाविष्ठ करता येणार नाही. त्यामुळे या दोघांना दुसऱ्या कसोटी सामन्यातून बाहेर पडावं लागलं आहे. हे दोन्ही खेळाडू सिडनीहून मेलबर्नला निघाल्याची माहिती क्रिकेट ऑस्ट्रेलियाने जारी केलेल्या प्रसिद्धीपत्रकात दिली आहे.
शमीला ऑस्ट्रेलियाविरोधातील पहिल्या कसोटी सामन्यात दुसऱ्या डावात फलंदाजी करताना दुखापत झाली. शमीच्या उजव्या हाताच्या मनगटाला दुखापत झाली. त्यामुळे शमीला मालिकेबाहेर व्हावे लागले. त्यात आता शमीला दुखापतीतून सावरण्यासाठी डॉक्टरांनी 6 आठवडे विश्रांती घेण्याचा सल्ला दिला आहे. यामुळे शमीचं इंग्लडंविरोधातील कसोटी मालिकेत खेळण्याबाबत अनिश्चितता आहे.
बॉर्डर-गावसकर मालिकेतील दुसरा कसोटी सामना 26 डिसेंबरपासून खेळण्यात येणार आहे. हा सामना मेलबर्न क्रिकेट ग्राऊंडवर खेळला जाणार आहे. विशेष म्हणजे या सामना बॉक्सिंग डे कसोटी सामना असणार आहे.
संबंधित बातम्या :
PHOTO | फिरकीचा राजा-युट्यूबची राणी, युजवेंद्र-धनश्री विवाहबद्ध
Mohammad Shami | ऑस्ट्रेलिया दौऱ्याला मुकलेला शमी, आता इंग्लंडविरोधातील कसोटी मालिकेला मुकणार?
Boxing Day cricket | बॉक्सिंग डे कसोटी म्हणजे काय?
(aus vs ind sean abbott and david warner both are ruled out from boxing day test match )