कॅनबेरा : बीग बॅश लीग स्पर्धेच्या (Big Bash League) 10 व्या पर्वाला 10 डिसेंबरपासून सुरुवात होत आहे. या स्पर्धेत रंगत आणण्यासाठी यामध्ये नव्या 3 नियम करण्यात आले आहेत. या नव्या 3 नियमांच स्वागत कमी विरोधच जास्त केला जात असल्याचं दिसत आहे. क्रिकेटपटूंपासून ते क्रिकेट चाहत्यांपर्यंत या नव्या 3 नियमांचा विरोध करण्यात येत आहे. त्यातच आता ऑस्ट्रेलियाचा माजी अष्टपैलू खेळाडू शेन वॉटसनने या नव्या नियमांमुळे चांगलाच संतापला आहे. bbl 2020 former australian all rounder player shane watson angry on 3 new rules of the big bash league
Entertainment levels ?
“The Power Surge, X-Factor and Bash Boost prioritise high scoring, exciting cricket, introduce new strategic angles and ensure there’s always something to play for throughout the entire match," – Head of BBL, Alistair Dobson #BBL10 pic.twitter.com/Nacna2XHw9
— KFC Big Bash League (@BBL) November 15, 2020
वॉटसनने आपल्या टी -20 वेबसाइट ब्लॉगवर लिहिले की, “मी आज बीबीएल पॉवर सर्ज, एक्स फॅक्टर प्लेयर्स आणि बॅश बूट्स या 3 नव्या नियमांबाबत वाचलं. बीबीएलला स्पर्धेला पुनरुज्जीवित करण्यासाठी हा सर्व प्रकार केला जात आहे. हे सर्व निरर्थक आहे. एखाद्या गोष्टीचा शेवट झाल्यानंतर पुन्हा त्यात जीव ओतण्याचा प्रयत्न का करतात”, असा प्रश्न विचारत वॉटसनने संताप व्यक्त केला आहे.
“या नव्या नियमांमुळे सामन्यादरम्यान गोंधळ निर्माण होऊ शकतो. “विज्ञानाचे हे नवीन प्रयोग” केवळ खेळाडू आणि प्रशिक्षकच नव्हे तर प्रेक्षकांसाठीही गुंतागुंतीचे ठरतील. या नियमांची चाचणी स्थानिक पातळीवर करायला हवी होती”, असंही वॉटससने नमूद केलं. वॉटससने आयपीएलमधील साखळी सामन्यानंतर निवृत्तीची घोषणा केली होती.
दरम्यान या नियमांवरुन टीम इंडियाचा माजी खेळाडू वसीम जाफरने मीमद्वारे फिरकी घेतली आहे. जाफरने बीग बॅश लीगच्या नव्या नियमांबाबतच्या ट्विटला रिट्विट केलं आहे आणि सोबत ‘गँग्स ऑफ वासेपूर’ चित्रपटातील एका सीनचा स्क्रीनशॉट शेअर केला आहे. स्र्किनशॉटच्या कॅप्शनमध्ये लिहिलं आहे की, “ये क्या बवासीर बना दिए हो?” जाफरचं हे ट्विट आता चांगलंच व्हायरल होत आहे. लोकांनी त्यावर मजेशीर प्रतिक्रिया देणं सुरु केलं आहे.
https://t.co/h3P6s3dLnl pic.twitter.com/LUq8GcIBJf
— Wasim Jaffer (@WasimJaffer14) November 16, 2020
या स्पर्धेत नव्या नियमांनुसार 2 पावर प्ले असणार आहेत. सर्वसाधारणपणे पॉवर प्ले सुरुवातीच्या 6 ओव्हरपर्यंत असतो. सामन्याच्या पहिल्या पावर प्लेमध्ये 2 ओव्हरने कपात करण्यात आली आहे. त्यामुळे केवळ सुरुवातीच्या 4 ओव्हरमध्येच पावर प्ले असणार आहे. तर त्यानंतर बॅटिंग करणाऱ्या संघाला 11 व्या ओव्हरनंतर कधीही पॉवरप्लेच्या 2 ओव्हरचा वापर करता येणार आहे. या निर्णयामुळे प्रत्येक संघाला फायदा होणार आहे.
सामन्याच्या काही तासांआधी प्लेइंग इलेव्हन म्हणजेच अंतिम 11 खेळाडू ठरवले जातात. या खेळाडूंनाच मैदानात विरोधी संघाविरोधात खेळता येतं. मात्र नव्या नियमानुसार 12 आणि 13 क्रमांकाच्या खेळाडूला खेळण्याची संधी मिळणार आहे. सामन्याच्या 10 ओव्हरनंतर प्लेइंग इलेव्हनमधील एका खेळाडूच्या बदलीत प्लेइंग इलेव्हनमध्ये समावेश नसलेल्या खेळाडूला संघात स्थान देता येणार आहे. मात्र यासाठी काही अटी आहेत. ज्या खेळाडूला बदली करण्यात येणार आहे, त्या खेळाडूने त्या सामन्यात फलंदाजी केलेली नसावी. किंवा बदली करण्यात येणारा खेळाडू जर गोलंदाज असेल तर त्याने त्या सामन्यात 1 ओव्हरपेक्षा जास्त गोलंदाजी केलेली नसावी. अशा खेळाडूंचीच बदली करुन दुसऱ्या खेळाडूंना संघात समाविष्ट करता येऊ शकणार आहे.
नव्या नियमांनुसार एका सामन्यासाठी 4 पॉइंट्स असणार आहेत. यापैकी 3 पॉइंट्स हे विजयी टीमला मिळणार आहेत. तर उर्वरित 1 पॉइंट हा बोनस स्वरुपात असणार आहे. 10 ओव्हरनंतर ज्या संघाची धावसंख्या जास्त असेल, त्या संघाला हा बोनस पॉइंट मिळणार आहे.
एकूण 68 दिवस चालणार स्पर्धा
बीग बॅश लीगचं पर्व एकूण 68 दिवस चालणार आहे. या स्पर्धेला 10 डिसेंबरपासून सुरुवात होणार आहे. तर शेवट 6 फेब्रुवारीला होणार आहे. या नव्या बदलांमुळे क्रिकेट रसिकांना नक्कीच आणखी रंगतदार सामने पाहायला मिळणार आहेत, याबद्दल अजिबात शंका नाही.
या स्पर्धेत आयपीएलप्रमाणे एकूण 8 संघांचा समावेश असतो. अॅडलेड स्ट्रायकर्स, ब्रिस्बेन हिट, होबार्ट हरिकेन्स, मेलबर्न रेनेगेड्स, मेलबर्न स्टार्स, पर्थ स्क्रॉचर्स, सिडनी सिक्सर्स, सिडनी थंडर असे 8 संघ या या स्पर्धेत खेळतात. पर्थ स्क्रॉचर्सने सर्वाधिक 3 वेळा या स्पर्धेतचं जेतेपद पटकावलं आहे. दरवर्षी डिसेंबर-फेब्रुवारीदरम्यान या स्पर्धेंचं आयोजन करण्यात येतं.
संबंधित बातम्या :
‘ये क्या बवासीर बना दिये हो?’ Big Bash League च्या नव्या नियमांवरुन वसीम जाफरने घेतली फिरकी
bbl 2020 former australian all rounder player shane watson angry on 3 new rules of the big bash league