Champions Trophy 2025 : पाचव्या नंबरवर कोण? गौतम गंभीरसमोर मोठा पेच, दोघांपैकी कोणाला निवडणार?

| Updated on: Jan 08, 2025 | 11:46 AM

Champions Trophy 2025 : पुढच्या महिन्यात चॅम्पियन्स ट्रॉफी स्पर्धा होणार आहे. 12 जानेवारी ही सर्वच टीम्ससाठी संघ निवडण्याची अंतिम तारीख आहे. टीम इंडियाचे हेड कोच गौतम गंभीर यांच्यासमोर पाचव्या क्रमांकावर कोणाला निवडायच? हा मोठा पेच आहे.

Champions Trophy 2025 : पाचव्या नंबरवर कोण? गौतम गंभीरसमोर मोठा पेच, दोघांपैकी कोणाला निवडणार?
Gautam Gambhir
Image Credit source: PTI
Follow us on

इंग्लंड विरुद्धची वनडे सीरीज ही टीम इंडियासाठी चॅम्पियन्स ट्रॉफीची रंगीत तालिम असणार आहे. या सीरीजमुळे टीम इंडियाला आपल्या तयारीचा आढावा घेण्याची आणि योग्य कॉम्बिनेशन सेट करण्यासाठी फायदा होईल. आता टीम इंडियाचे हेड कोच गौतम गंभीर यांच्यासमोर प्रश्न हा आहे की, विकेटकीपर फलंदाज कोण असेल? प्लेइंग इलेव्हनमध्ये कोणाला संधी मिळणार? यासाठी केएल राहुल आणि ऋषभ पंत यांच्यासमध्ये स्पर्धा आहे. हे दोघेही बहुतांशवेळा पाचव्या नंबरवर फलंदाजी करतात. टीम इंडियाला चॅम्पियन्स ट्रॉफीचे सामने दुबईत खेळायचे आहेत. अशावेळी पंच आणि राहुल यांच्यामध्ये एकाची निवड करताना गंभीरच्या डोक्यात तिथल्या कंडीशन्स असतील.

चॅम्पियन्स ट्रॉफीसाठी टीम इंडियाच्या स्कवॉडमद्ये कोण-कोण असेल?. बहुतांश खेळाडूंची नाव पक्की आहेत. पण इंग्लंड विरुद्धच्या सीरीजमधून कोण किती फॉर्ममध्ये आहे, टीमची तयारी कशी आहे, ते समजेल. यात खेळाडूंचा सध्याचा फॉर्म पाहिला जाईल. यावेळी केएल राहुल आणि ऋषभ पंत या दोघांवर जास्त नजर असेल.

कोणाच प्रदर्शन भारी आहे?

ऋषभ पंत आणि केएल राहुल यांच्यामध्ये दुबईच्या इंटरनॅशनल क्रिकेट स्टेडियमवर कोणाच प्रदर्शन भारी आहे?. ऋषभ पंतकडे दुबईत एकही सामना खेळण्याचा अनुभव नाहीय. चॅम्पियन्स ट्रॉफीच्या निमित्ताने त्याला दुबईत पहिल्यांदा खेळण्याची संधी मिळेल. केएल राहुलने दुबईमध्ये फक्त एक वनडे सामना खेळला आहे. त्याने 60 धावा केल्या होत्या. पण ही गोष्ट जुनी आहे. त्याला 6 वर्ष झाली. सध्याचा फॉर्म कसा आहे? हे महत्त्वाच आहे.

तो मॅच विनर

पंत आणि राहुल यांच्या सध्याच्या फॉर्मचा निर्णय इंग्लंड विरुद्धच्या वनडे सीरीजमध्ये होईल. त्यानंतर गौतम गंभीर दोघांपैकी एकाला चॅम्पियन्स ट्रॉफीमध्ये खेळवण्याचा निर्णय घेऊ शकतात. इंग्लंड विरुद्ध दोघांची बॅट तळपली, तर भारतीय टीम मॅनेजमेंट राहुलला नंबर 4 वर खेळवण्याचा निर्णय घेऊ शकते. फॉर्ममध्ये असूनही दोघांपैकी एकाला खेळवण्याचा निर्णय झाला, तर मग पंतला संधी मिळू शकते. कारण मिडल ऑर्डरमध्ये तो वेरिएशन देतो आणि मॅच विनर आहे. सर्वात महत्त्वाच म्हणजे तो लेफ्टी बॅट्समन आहे. यावर टीम मॅनेजमेंटला अंतिम निर्णय घ्यायचा आहे.