Chess Olympiad वर 100 कोटी रुपये खर्च, भारताच्या आयोजनाने जगाला केलं थक्क

| Updated on: Aug 12, 2022 | 7:39 AM

चेन्नईला मार्च महिन्यात चेस ऑलिम्पियाडच यजमानपद मिळालं. आधी ही स्पर्धा रशिया मध्ये होणार होती. पण युक्रेनवर हल्ला केल्यानंतर रशियाला यजमानपद नाकारण्यात आलं.

Chess Olympiad वर 100 कोटी रुपये खर्च, भारताच्या आयोजनाने जगाला केलं थक्क
chess
Image Credit source: PTI
Follow us on

मुंबई: चेन्नईला मार्च महिन्यात चेस ऑलिम्पियाडच यजमानपद मिळालं. आधी ही स्पर्धा रशिया मध्ये होणार होती. पण युक्रेनवर हल्ला केल्यानंतर रशियाला यजमानपद नाकारण्यात आलं. भारताने पुढची अनेक वर्ष लक्षात राहील, असं चार महिन्यात चेस ऑलिम्पियाड स्पर्धेचं आयोजन करुन दाखवलं. चेस ऑलिम्पियाडच यशस्वी आयोजन करुन भारताने जगभरातील अधिकाऱ्यांना प्रभावित केलं. तामिळनाडू सरकारने याआधी 2013 मध्ये वर्ल्ड चॅम्पियनशिप आयोजित केली होती. पण यावेळी स्थिती त्यापेक्षा वेगळी होती. 186 देशांचे 1700 खेळाडू या स्पर्धेत सहभागी झाले होते. तामिळनाडू सरकारने या स्पर्धेच्या आयोजनावर 100 कोटी रुपये खर्च केले.

ट्रान्सपोर्टची खूप शानदार व्यवस्था

ट्रान्सपोर्टची खूप शानदार व्यवस्था करण्यात आली होती. 124 बसेस, 100 एसयूव्हीची खेळाडू आणि देशी-परदेशी पाहुण्याची ने-आण करण्यासाठी व्यवस्था करण्यात आली होती. चेन्नई एयरपोर्टपासून महाबलिपुरम पर्यंतचा रस्ता रुंद करण्यात आला होता. जेणेकरुन ट्राफिक कमी होईल. एक पूर्ण लेन ऑलिम्पियाड साठी रिजर्व ठेवण्यात आली होती.

30 हजार लोक सहभागी

चेस ऑलिम्पियाडच्या ओपनिंग आणि क्लोजिंग सेरेमनची भव्य आयोजन करण्यात आलं होतं. यात पंतप्रधान नरेंद्र मोदी, अभिनेते रजनीकांत सहभागी झाले होते. ओपनिंग सेरेमनीसाठी फॉर पॉइंटस ऑफ शेराटन नावाचं स्टेडियम तोडून अजून मोठं बनवण्यात आलं. ओपनिंग सेरेमनी मध्ये जवळपास 30 हजार लोक सहभागी झाले होते.

कशी होती सुरक्षा व्यवस्था?

कोविड-19 चा धोका लक्षात घेऊन बरीच व्यवस्था, उपायोजना करण्यात आली होती. एयरपोर्ट, हॉटेल आणि वेन्युच्या ठिकाणी कोरोना चाचण्या करण्यात आल्या. 1000 डॉक्टर दिवस-रात्र ड्युटीवर तैनात होते. सर्व खेळाडूंना वीमा कार्ड देण्यात आले होते. सुरक्षेसाठी 4000 पोलीस अधिकारी तैनात होते. ड्रोनद्वारे सुरक्षेवर लक्ष ठेवण्यात आले. 28-29 जुलैला कुठल्याही फ्लाइटला शहराच्या वरुन जाण्याची परवानगी दिली नाही.