मुंबई: आईच (Mother) आपल्या मुलांबरोबर (Child) नातंच वेगळं असतं. मुलांचं स्वप्न साकार करण्यासाठी आई आपली ताकत पणाला लावते. मग मुलांकडून साथ मिळो, अथवा न मिळो. आई मुलांच स्वप्न स्वत: जगते. ते स्वप्न पूर्ण करण्यासाठी ती मेहनत घेते. ते स्वप्न साकार झाल्यानंतरच तिला मनशांती मिळते. अशीच एक आई आपल्या मुलीच्या स्वप्नांना पूर्ण करण्याची तयारी करतेय. पण या आईला स्वत:ला मानसिक दृष्टया तितकचं मजबूतही कराव लागणार आहे. लॉरा आपल्या 14 वर्षाच्या मुलीच्या जागी कॉमनवेल्थ गेम्सआधी (CWG) क्वीन बॅटन रिले मध्ये सहभागी होणार आहे.
लॉराची मुलगी स्काई गार्डनरचा यावर्षी मार्च महिन्यात ह्दयविकाराच्या झटक्याने मृत्यू झाला. चढ-उतारांनी भरलेल्या आयुष्यात कधीही हार न मानण्याच्या स्वभावामुळे स्काईला शाळेतील शिक्षकांनी रिलेसाठी नॉमिनेट केलं होतं. पण दुर्देवाने स्काईला तिची रिलेसाठी निवड झालीय हे कधी समजलच नाही. आता स्काईच्या जागी तिची आई लॉरा या रिले मध्ये सहभागी होणार आहे.
14 वर्षाच्या स्काईने प्रकृतीशी संबंधित वेगवेगळ्या समस्यांमधून स्वत:ला बऱ्यापैकी सावरलं होतं. यात ब्रेन मध्ये ब्लीडिंग, कार्डियक अरेस्ट आणि 2 ओपन हार्ट सर्जरी सुद्धा आहेत. 10 मार्चला स्काई शाळेतून एका सहलीला गेली होती. तिथे कोरोनरी हार्टच्या आजाराबरोबर ती आयुष्याची लढाई हरली. झोपेमध्येच तिने जगाचा निरोप घेतला. “स्काईला रिलेसाठी नॉमिनेट झाल्याचं समजलं असतं, तर भरपूर आनंद झाला असता. पण तिला हे कळण्याआधीच तिने जगाचा निरोप घेतला. तिच्या स्मृतीमध्ये रिलेत सहभागी होणं, सन्मानाची बाब आहे” असं लॉरा म्हणाली.