मुंबई: कॉमनवेल्थ गेम्स (commonwealth games 2022) मध्ये पुन्हा एकदा क्रिकेटचा (Cricket) समावेश झाला आहे. पुरुष क्रिकेट नाही, पण 24 वर्षानंतर महिला क्रिकेट सामन्यांचे आयोजन कॉमन वेल्थ मध्ये होणार आहे. भारतीय महिला क्रिकेट (Indian womens Cricket) संघ मेडल जिंकणार की, नाही हे 3 सामन्यांच्या निकालावरुन स्पष्ट होईल. तुम्ही म्हणालं, फक्त तीन सामने खेळून मेडल कसं निश्चित होईल? त्यासाठी तुम्हाला भारतीय संघ कोणाविरुद्ध खेळणार आहे, ते लक्षात घ्यावं लागेल. कॉमनवेल्थ गेम्स मध्ये क्रिकेट खेळणारे 8 देश सहभागी होणार आहेत. त्यांची दोन गटात विभागणी करण्यात आली आहे.
भारतीय संघ ग्रुप ए मध्ये आहे. या ग्रुप मध्ये ऑस्ट्रेलिया, पाकिस्तान आणि बार्बाडोस हे तीन संघ आहेत. इंग्लंड, न्यूझीलंड, दक्षिण आफ्रिका आणि श्रीलंका हे संघ ग्रुप बी मध्ये आहेत. दोन्ही ग्रुपमधून दोन संघ सेमीफायनल मध्ये जातील. सेमीफायनल मध्ये प्रवेश करण्यासाठी ग्रुप स्टेज मधील 2 सामने चांगल्या मार्जिनने जिंकावे लागतील.
भारताचा सामना 29 जुलैला ऑस्ट्रेलिया विरुद्ध आहे. 31 जुलैला पाकिस्तानविरुद्ध आणि 3 ऑगस्टला बार्बाडोस विरुद्ध होणार आहे. हरमनप्रीत कौरच्या टीमने दोन सामने जरी जिंकले, तरी ते सेमीफायनल मध्ये पोहोचतील. सेमीफायनल जिंकल्यानंतर फायनल मध्ये मेडल निश्चित होईल. सेमीफायनल हरल्यानंतर मेडल जिंकण्याची संधी असेल. म्हणजे फक्त 3 सामन्यांद्वारे टीम इंडियाला मेडल जिंकता येईल.
भारताला राष्ट्रकुल कडे अन्य स्पर्धेप्रमाणे पाहण्याची आवश्यकता आहे. इथे परिस्थिती थोडी भिन्न असेल. इथे आयसीसीची स्पर्धा नाही. खेळाडू पूर्ण पथकासह सहभागी होणार आहेत. देशासाठी पदक जिंकण्याचा त्यांचा प्रयत्न असेल. स्पर्धेत अनेक चांगले संघ उतरत आहेत. त्याशिवाय भारतीय महिला संघाने टी 20 मध्ये चांगली कामगिरी केलेली नाही. भारतीय टीम प्रगति करतेय.