मुंबई: बर्मिंघम मध्ये गुरुवारी ओपनिंग सेरेमनी बरोबर कॉमनवेल्थ गेम्स 2022 ची सुरुवात होईल. या गेम्स मध्ये 72 देशाचे जवळपास 5000 स्पर्धक सहभागी होणार आहेत. वेगवेगळ्या खेळांमध्ये ते आपली दावेदारी सादर करतील. भारताने 322 सदस्यांचं पथक बर्मिंघमला पाठवलं आहे. यावेळी तमाम देशवासियांना भारत मेडल्सच शतक पूर्ण करेल, अशी अपेक्षा आहे. भारतीय पथकात पुरुष आणि महिला खेळाडूंची संख्या जवळपास एकसारखीच आहे. टोक्यो ऑलिम्पिक मधील सुवर्णपदक विजेता नीरज चोप्रा बाहेर गेल्यामुळे भारतीय चाहते नक्कीच निराश आहेत. पण भारताचे अन्य खेळाडू सुद्धा सुवर्णपदकाचे दावेदार आहेत.
कॉमनवेल्थ गेम्स मध्ये यावेळी ब्रिटनची महाराणी दिसणार नाही. त्यांच्याजागी त्यांचे पुत्र प्रिन्स चार्ल्स सेरेमनी मध्ये सहभागी होतील. एलेक्जेंडर स्टेडियम मध्ये 30 हजार प्रेक्षक सहभागी होतील, अशी अपेक्षा आहे. कॉमनवेल्थ आयोजनाची ही 22 वी वेळ आहे. भारताकडून सेरेमनीसाठी ध्वजवाहक कोण असेल, हे अजून स्पष्ट नाहीय. नीरज चोप्राला दुखापत झाल्यामुळे आता ही जबाबदारी दोन वेळच्या ऑलिम्पिक पदक विजेत्या पी.व्ही.सिंधूला मिळू शकते.
भारताने मागच्यावेळी गोल्डकोस्ट मध्ये झालेल्या कॉमनवेल्थ गेम्स मध्ये 66 पदकं जिंकली होती. यात 66 मध्ये 26 सुवर्णपदकं होती. कॉमनवेल्थ गेम्स मध्ये भारताने सन 2010 मध्ये सर्वश्रेष्ठ प्रदर्शन केलं. भारत त्यावेळी दिल्लीत झालेल्या कॉमनवेल्थ स्पर्धेचा यजमान होता. भारताने त्यावेळी पहिल्यांदा पदकाचं शतक गाठलं होतं. यावेळी शूटिंगचा समावेश नाहीय. त्याचा भारताला फटका बसेल. पण तरीही भारतीय खेळाडू जास्तीत जास्त मेडल जिंकण्याचा प्रयत्न करतील.
कधी, कुठे आणि कशी पाहू शकता ओपनिंग सेरेमनी
कॉमनवेल्थ गेम्स 2022 ची ओपनिंग सेरेमनी कधी आयोजित होणार?
कॉमनवेल्थ गेम्स 2022 ची ओपनिंग सेरेमनी 28 जुलैला होणार.
कुठे होणार कॉमनवेल्थ गेम्स 2022 ची ओपनिंग सेरेमनी?
कॉमनवेल्थ गेम्स 2022 ची ओपनिंग सेरेमनी बर्मिंघमच्या एलेक्जेंडर स्टेडियम मध्ये होणार.
किती वाजता सुरु होणार, कॉमनवेल्थ गेम्स 2022 ची ओपनिंग सेरेमनी?
कॉमनवेल्थ गेम्स 2022 ची ओपनिंग सेरेमनी बर्मिंघम मध्ये संध्याकाळी सात वाजता आणि भारतीय वेळेनुसार, रात्री 11.30 वाजता सुरु होणार.
कुठे पाहू शकता, कॉमनवेल्थ गेम्स 2022 च्या ओपनिंग सेरेमनीचं लाइव टेलीकास्ट?
कॉमनवेल्थ गेम्स 2022 च्या ओपनिंग सेरेमनीचं लाइव टेलीकास्ट तुम्ही Sony Ten 1, Sony Ten 2, Sony Ten 3, Sony Six आणि डीडी स्पोर्ट्स वर पाहू शकता.
कॉमनवेल्थ गेम्स 2022 च्या ओपनिंग सेरेमनीच लाइव स्ट्रीमिंग कुठे पाहू शकता?
कॉमनवेल्थ गेम्स 2022 च्या ओपनिंग सेरेमनीचं लाइव स्ट्रीमिंग सोनी लिव APP वर पाहता येईल.