मुंबई: बर्मिंघम कॉमनवेल्थ गेम्स 2022 मध्ये एका टप्पा पूर्ण झाला आहे. राष्ट्रकुलचे पाच दिवस पूर्ण झाले आहेत. मेडल्ससाठीची स्पर्धा वेग पकडतेय. पदकतालिकेत तिसऱ्या स्थानापासून ही शर्यत सुरु होतेय. पहिल्या स्थानावर ऑस्ट्रेलियाकडे विशाल आघाडी असून त्यांचा दबदबा कायम आहे. यजमान इंग्लंड दुसऱ्या स्थानावर आहे. काल गेम्सचा पाचवा दिवस भारतासाठी चांगला ठरला. भारताने 2 गोल्डसह 4 मेडल्स जिंकले.
मंगळवारी 2 ऑगस्टला भारताची कामगिरी आधीच्या दिवसांच्या तुलनेत चांगली ठरली. भारताकडून महिला संघाने लॉन बॉलच्या टीम इवेंट मध्ये ऐतिहासिक गोल्ड मेडल जिंकलं. त्यानंतर पुरुष संघाने टेबल टेनिस मध्ये सलग दुसरं गोल्ड मेडल मिळवलं. भारताकडून विकास ठाकूरने वेटलिफ्टिंग आणि बॅडमिंटनच्या मिक्सड टीम इवेंट मध्ये भारताने रौप्यपदक विजेती कामगिरी केली.
मंगळवारच्या प्रदर्शनानंतर पदकांची संख्या 9 वरुन 13 झाली. पण त्याने पदकतालिकेतील स्थानावर फरक पडला नाही. भारतीय टीम 5 गोल्ड सह एकूण 13 पदकं मिळवून सहाव्या स्थानावर आहे. फक्त भारतच नाही, पदकतालिकेत पहिल्या सहा स्थानांमध्येही कुठला बदल झाला नाही.
Day 5 is done. Here’s how the table is looking?
Watch out South Africa, India are hot on your tail?
Follow all tomorrow’s action ⬇️https://t.co/8u2EKSwAjk @TeamSA2024 @WeAreTeamIndia pic.twitter.com/QCvkz5PpOn
— Birmingham 2022 (@birminghamcg22) August 2, 2022
ऑस्ट्रेलियाचा पहिल्या स्थानावर जलवा कायम आहे. त्यांच्याकडे मोठी आघाडी आहे. ऑस्ट्रेलियाने 42 गोल्डसह एकूण 106 मेडल्स जिंकली आहेत. नेहमीप्रमाणे ऑस्ट्रेलियासाठी स्विमर्सनी पदक जिंकण्यात महत्त्वपूर्ण योगदान दिलं. त्यांनी स्विमिंग मध्ये 6 गोल्डसह एकूण 17 पदकं जिंकली आहेत. यजमान इंग्लंडने वेगवेगळ्या खेळांमध्ये मेडल्स मिळवली आहेत. ते दुसऱ्या स्थानावर आहेत. आतापर्यंत 29 देशांनी मेडल्स जिंकली आहेत. 128 गोल्डसह 391 मेडल्स एथलीट्सनी मिळवली आहेत.