CWG 2022 Live Update: वेटलिफ्टर मीराबाई चानूला गोल्ड मेडल

| Updated on: Jul 31, 2022 | 12:18 PM

कॉमनवेल्थ गेम्स लाइव: भारताने पहिल्या दिवशी चांगली कामगिरी केली. आता दुसऱ्या दिवशीही भारतीय खेळाडू चांगली कामगिरी करतील अशी अपेक्षा आहे.

CWG 2022 Live Update: वेटलिफ्टर मीराबाई चानूला गोल्ड मेडल
weightlifting medals
Follow us on

कॉमनवेल्थ गेम्स (CWG) लेटेस्ट न्यूज: राष्ट्रकुल क्रीडा स्पर्धेचा पहिला दिवस भारतासाठी समाधानकारक होता. काही निराशाजनक गोष्टी सुद्धा घडल्या. पण चांगल्या बातम्या जास्त होत्या. आता कॉमनवेल्थ गेम्सचा दुसरा दिवस आहे. आज पदकांच खात उघडलं जाण्याची शक्यता आहे. भारताला पहिलं पदक मिळू शकतं. टोक्यो ऑलिम्पिक मधील रौप्यपदक विजेती मीरबाई चानू 55 किलोग्रॅम वजनी गटात सहभागी होणार आहे. त्याशिवाय भारतीय बॉक्सर्स वर नजरा असतील. आज भारताचे एकूण 12 बॉक्सर्स रिंग मध्ये उतरतील. पुरुष गटात अमित पंघाल आणि शिव थापावर नजर असेल. महिला गटात निकहत जरीन आणि लवलीना वर नजर असेल.

LIVE NEWS & UPDATES

The liveblog has ended.
  • 30 Jul 2022 10:30 PM (IST)

    वेटलिफ्टर मीराबाई चानूला गोल्ड मेडल

    वेटलिफ्टर मीराबाई चानूला राष्ट्रकूल स्पर्धेत गोल्ड मेडल मिळाले आहे. 49 वयोगटाच्या श्रेणीत तिला गोल्ड मिळेल अशी आशा होती. तिने ती सार्थ करुन दाखवली आहे.

  • 30 Jul 2022 08:48 PM (IST)

    महाराष्ट्राचा इतका तिरस्कार असेल तर त्यांनी दुसऱ्या कोणत्याही राज्यांत जावे – उदयनराजे भोसले

    छत्रपती शिवाजी महाराजांच्या महाराष्ट्राने देशाला एका वेगळ्या उंचीवर नेले आहे. मात्र राज्यपाल भगतसिंह कोश्यारी हे याच महाराष्ट्राचा अपमान करीत आहेत. इतकच नाही तर अनेक हुतात्म्यांच्या बलिदानातून उभारलेल्या महाराष्ट्राचा इतका तिरस्कार असेल तर त्यांनी दुसऱ्या कोणत्याही राज्यांत जावे अशी टीका राज्यसभेचे खासदार उदयनराजे भोसले यांनी केली आहे.


  • 30 Jul 2022 08:45 PM (IST)

    Weightlifting: वेटलिफ्टर गुरुराजने हे पदक पत्नीला समर्पित केले

    वेटलिफ्टर गुरुराजने आपले कांस्यपदक पत्नी सौजन्याला समर्पित केले. गेल्या वर्षीच त्याचा सौजन्याशी विवाह झाला. मात्र, स्पर्धेची तयारी आणि ट्रेनिंगमुळे त्याला पत्नीसह जास्त वेळ घालवता आला नाही.

  • 30 Jul 2022 08:28 PM (IST)

    उद्या मुख्यमंत्री एकनाथ शिंदे गुड न्यूज देऊ शकतात, माजी मंत्री संदीपान भुमरे यांची प्रतिक्रिया

    उद्या मुख्यमंत्री एकनाथ शिंदे गुड न्यूज देऊ शकतात, माजी मंत्री संदीपान भुमरे यांनी ही प्रतिक्रिया दिली आहे. थोड्यात वेळात मुख्यमंत्री एकनाथ शिंदे दिल्लीला रवाना होणार आहेत. या दिल्ली दौऱ्यात मंत्री मंडळ विस्ताराबाबत महत्वाचा निर्णय होण्याची शक्यता आहे.

  • 30 Jul 2022 07:46 PM (IST)

    Table Tennis: भारतीय पुरुषांची नॉदर्न आयर्लंडवर 3-0 ने मात

    टेबल टेनिसमध्ये पुरुषांच्या टीम इवेंट मध्ये भारताने नॉर्दन आयर्लंडवर 3-0 ने विजय मिळवला. पहिल्या दोन सामन्यानंतर हरमीत देसाईने ओवन काटकार्टला 3-2 ने हरवून भारताचा विजय निश्चित केला. भारताने हा सामना 3-0 ने विजय मिळवला.

  • 30 Jul 2022 07:09 PM (IST)

    Squash: जोश्ना चिनाप्पाने पहिला सामना जिंकला

    भारताच्या जोश्ना चिनाप्पाने राऊंड ऑफ 32 मध्ये मेगन बेस्टला 11-8,11-9,12-10 असं हरवलं. प्री क्वार्टर फायनल मध्ये तिने आपलं स्थान पक्क केलं.

  • 30 Jul 2022 06:34 PM (IST)

    वेटलिफ्टिंग मध्ये भारताला आणखी एक पदक

    गुरुराज पुजारीने 61 किलो वजनीगटात कांस्यपदक जिंकलं, त्याने स्नॅच मध्ये 118 किलो आणि क्लीन अँड जर्क मध्ये 151 किलो वजन उचललं. एकूण 269 किलो वजनासह त्याने तिसरं स्थान मिळवलं.

  • 30 Jul 2022 05:56 PM (IST)

    Hockey: महिला हॉकी संघाच्या स्टार खेळाडूला कोरोना

    भारतीय महिला हॉकी संघाला सामन्याआधी कोरोनाचा फटका बसला आहे. टीमची स्टार खेळाडू नवजोत कौरला कोरोनाची लागण झाली आहे.

  • 30 Jul 2022 05:40 PM (IST)

    Boxing: मोहम्मद हसमुद्दीनने पहिला सामना जिंकला

    भारताचा बॉक्सर मोहम्मद हसमुद्दीने राऊंड ऑफ 32 मध्ये दक्षिण आफ्रिकेच्या अजमोले दयेयीवर 5-0 ने विजय मिळवला. तो आता राऊंड 16 मध्ये पोहोचला आहे.

  • 30 Jul 2022 05:04 PM (IST)

    पंतप्रधान नरेंद्र मोदींनी संकेतला दिल्या शुभेच्छा

    कॉमनवेल्थ गेम्स मध्ये भारताला पहिलं पदक मिळवून देणाऱ्या संकेत महादेव सरगरला पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी शुभेच्छा दिल्या आहेत.

  • 30 Jul 2022 04:57 PM (IST)

    Weightlifting: गुरुराजाची मेडलसाठी दावेदारी

    वेटलिफ्टिंगमध्ये पुरुषांचं 61 किलो वजनी गटात इवेंट सुरु झाला आहे. भारताकडून गुरुराजा या गटात आव्हान देणार आहे.

  • 30 Jul 2022 04:54 PM (IST)

    Badminton: भारताची श्रीलंकेवर 4-0 आघाडी

    सुमित रेड्डी आणि चिराग शेट्टीच्या जोडीने दुमिनदु आणि सचिन या श्रीलंकन जोड़ीवर 21-10,21-13 असा विजय मिळवला. भारताने आता मिक्स्ड टीम इवेंट मध्ये श्रीलंकेविरुद्ध 4-0 ची आघाडी मिळवली आहे.

  • 30 Jul 2022 03:52 PM (IST)

    वेटलिफ्टिंग मध्ये संकेतच रौप्य पदक

    संकेतने कॉमनवेल्थ गेम्स मध्ये भारताला पहिलं पदक मिळवून दिलं आहे. 55 किलो वजनीगटात संकेत यशस्वी ठरला. त्याने रौप्यपदक मिळवून दिलं. क्लीन अँड जर्कच्या दुसऱ्या प्रयत्नात संकेतला दुखापत झाली. पण तरीही त्याने तिसरा प्रयत्न केला. पण यश मिळालं नाही. त्याची सुवर्णपदाकाची संधी हुकली.

  • 30 Jul 2022 03:21 PM (IST)

    टेबल टेनिस: भारतचा एकतर्फी विजय

    भारताच्या महिला टेबल टेनिस टीमने शानदार विजय मिळवला. त्यांनी गयानाच्या संघावर 3-0 असा एकतर्फी विजय मिळवला.

  • 30 Jul 2022 03:02 PM (IST)

    बॅडमिंटन: लक्ष्य सेनचा विजय

    लक्ष्य सेनने मिक्स्ड टीम इवेंट मध्ये पुरुष एकेरीत विजय मिळवला आहे. त्याने श्रीलंकन खेळाडूवर 21-18, 21-5 असा सहज विजय मिळवला. भारताने श्रीलंकेवर 2-0 अशी आघाडी घेतली आहे.

  • 30 Jul 2022 02:39 PM (IST)

    वेटलिफ्टिंग: संकेतची चांगली सुरुवात

    वेटलिफ्टिंग मध्ये संकेतने चांगली सुरुवात केली. त्याने स्नॅचच्या पहिल्या प्रयत्नात 111 किलो वजन उचललं. दुसऱ्या प्रयत्नात 112 किलो वजन उचललं.

  • 30 Jul 2022 02:20 PM (IST)

    दुसरा गेमही जिंकला

    अश्विन पोनप्पा आणि सात्विक साईराज जोडीने मिश्र दुहेरीत श्रीलंकेच्या सचिन दास आणि थिलिनि हेंडाहेवा जोडीवर आघाडी घेतली. पहिला गेम जिंकल्यानंतर 21-14, दुसरा गेमही 21-19 खिशात घातला

  • 30 Jul 2022 02:13 PM (IST)

    बॅडमिंटन: सात्विक-अश्विनी जोडीची चांगली सुरुवात

    बॅडमिंटन मध्ये अश्विन पोनप्पा आणि सात्विक साईराज जोडीने पहिला गेम जिंकाल आहे. 21-14 असा त्यांनी गेम जिंकला.

  • 30 Jul 2022 02:11 PM (IST)

    वेटलिफ्टिंग मध्ये सामना सुरु

    पुरुष वर्ग 55 किलो वजनीगटात सामने सुरु झाले आहेत. भारताकडे संकेत महादेव पदाकासाठी दावेदार आहेय.

  • 30 Jul 2022 01:08 PM (IST)

    भारताला पहिलं पदक मिळणार?

    1.30 वाजता वेटलिफ्टिंग मध्ये भारताकडून संकेत महादेल 55 किलो वजनीगटात उतरणार आहेत. संकेत भारतासाठी पदकांच खात उघडेल, अशी अपेक्षा आहे. संकेत खेलो इंडिया यूथ गेम्स 2020 आणि खेलो इंडिया युनिवर्सिटी गेम्स 2020 मध्ये चॅम्पियन होता.

  • 30 Jul 2022 11:40 AM (IST)

    चंद्रकांत पाटलांकडून महिला हॉकी संघाला शुभेच्छा

  • 30 Jul 2022 11:34 AM (IST)

    डोपिंग मध्ये फसला घानाचा बॉक्सर

    कॉमनवेल्थ स्पर्धा सुरु झाली आहे. पहिल्याच दिवशी घानाच्या बॉक्सर डोपिंग मध्ये अडकला आहे. त्याने प्रतिबंधित औषधाच सेवन केल्याचं आढळून आलं. प्रतिबंधित औषध सेवनाचा त्याचा रिपोर्ट पॉझिटिव्ह आला.

  • 30 Jul 2022 10:36 AM (IST)

    हॉकी टीम पुन्हा कमाल करणार

    भारतीय महिला हॉकी संघाने पहिल्या सामन्यात घानावर 5-0 असा दणदणीत विजय मिळवला. आज वेल्स विरुद्ध दुसरा सामना खेळणार आहे.

  • 30 Jul 2022 10:34 AM (IST)

    12 भारतीय बॉक्सर्सवर नजर

    मीराबाई चानू व्यतिरिक्त भारतीय बॉक्सर्सवर नजरा असतील. भारताचे दिग्गज बॉक्सर्स रिंगमध्ये उतरणार आहेत. यात ऑलम्पिक पदक विजेती लवलीना बोरगोहेन, विश्व चॅम्पियन निकहत जरीन, अमित पंघाल यांचा समावेश आहे.

  • 30 Jul 2022 10:32 AM (IST)

    असा आहे आजचा कार्यक्रम

  • 30 Jul 2022 10:31 AM (IST)

    आज पदकाचं खात उघडणार

    बर्मिंघम राष्ट्रकुल क्रीडा स्पर्धेचा आज दुसरा दिवस आहे. आज भारताला पहिलं पदक मिळण्याची शक्यता आहे. टोक्यो ऑलिम्पिक मधील रौप्यपदक विजेती मीरबाई चानू 55 किलोग्रॅम वजनी गटात सहभागी होणार आहे.