मुंबई: कॉंमनवेल्थ गेम्स 2022 सुरु झाल्यापासून भारतीय वेटलिफ्टर्सनी पदक जिंकून देण्याची जबाबदारी जणू आपल्या खांद्यावरच घेतली. स्पर्धेच्या दुसऱ्यादिवसापासून भारतीय वेटलिफ्टर्स पदक विजेती कामगिरी करत आहेत. भारताला आतापर्यंत कॉमनवेल्थ मध्ये 6 पदकं मिळाली आहेत. ही सर्व पदकं वेटलिफ्टिंगच्या खेळातच जिंकली आहेत. यात तीन गोल्ड मेडल आहेत. कालच्या दिवसात 19 वर्षीय जेरेमी लालरिनुंगानं पहिलं गोल्ड मेडल मिळवलं. त्यानंतर अचिंता शेउलीने सुवर्णपदक विजेती कामगिरी केली आहे. 20 वर्षाच्या या मुलाने तब्बल 313 किलो वजन उचललं. अचिंता खूपच सामान्य कुटुंबातून येतो. त्याचे वडिल मजूर आहेत. प्रतिकुल परिस्थितीवर मात करुन त्याने ही सुवर्णपदक विजेती कामगिरी केली आहे.
कॉमनवेल्थ गेम्स मध्ये तिरंगा फडकावणारा अचिंता शेउली तिसरा वेटलिफ्टर आहे. देशासाठी आपल्या बळावर त्याने गोल्ड मेडल जिंकलं. अचिंता शेउलीने 313 किलो वजन उचललं. कॉमनवेल्थ गेम्स मध्ये पुरुषांच्या 73 किलो वजनी गटातील हा नवीन रेकॉर्ड आहे.
पश्चिम बंगालच्या हावडा मध्ये अचिंता शेउलीचा जन्म झाला. वेटलिफ्टिंग मध्ये शिखरापर्यंत पोहोचण्याचा त्याचा प्रवास सोपा नाहीय. लोखंड उचलण्याच्या या खेळात त्याने लोखंडासारखी इच्छाशक्ती दाखवली. त्याचे वडिल रिक्षाचालक होते. काहीवेळा मजुरी करुन कुटुंबाचं पालन-पोषण करायचे. अचिंता शेउली 12 वर्षांचा असताना, वडिलांच निधन झालं. कुटुंबावर दु:खाचा डोंगर कोसळला. वडिलांच्या निधनानंतर कुटुंबासमोर चरितार्थ चालवण्याचा प्रश्न होता.
वडिल हयात असतानाच, अचिंता शेउलीने वेट लिफ्टिंगची प्रॅक्टिस सुरु केली होती. अचिंता समोर आता दुहेरी आव्हान होते. कुटुंबाला तो मदत करायचा आणि वेटलिफ्टिंगची प्रॅक्टिसही. त्याने आई आणि भावासोबत मिळून कपडे शिवण्याचं कामही केले.
Third Gold ? Congratulation India ?? .
India have now won 3 gold medal in #CWG2022 and all have come from weightlifting.
Congratulations #AnchitaSheuli pic.twitter.com/1qltrRoKtR— Nitish Silawat (@SilawatNitish) August 1, 2022
माणूस मेहनतीने बनतो. अचिंताचा संघर्ष फळाला आला. त्याने लवकरच मेडल जिंकायला सुरुवात केली. लहान वयापासूनच गोल्ड मेडल जिंकण्याची सवय लागली. 2018 यूथ गेम्स मध्ये गोल्ड मेडल जिंकलं. दोन वेळा कॉमनवेल्थ चॅम्पियनशिप जिंकली. 2021 ज्यूनियर वर्ल्ड चॅम्पियनशिप मध्ये रौप्यपदक विजेती कामगिरी केली.
करीयर मधलं सर्वात मोठं यश बर्मिंघम कॉमवेल्थ गेम्स मध्ये मिळवलं. कॉमनवेल्थ गेम्स मध्ये तो चॅम्पियन बनला. त्याने मागचे सर्व रेकॉर्ड मोडले. त्याने 313 किलो वजन उचललं. प्रत्येक भारतीयासाठी ही अभिमानाची बाब आहे.