World Cup 2023 : टीम इंडियाने सेमीफायनलमध्ये न्यूझीलंडचा 70 धावांनी पराभव करून फायनलमधील आपले तिकीट निश्चित केले. आज दुसरा उपांत्य सामना ऑस्ट्रेलिया आणि दक्षिण आफ्रिका यांच्यात 16 नोव्हेंबर रोजी कोलकाता येथे होणार आहे. या सामन्यानंतर भारतीय संघ अंतिम सामना कोणत्या संघासोबत खेळणार हे चित्र स्पष्ट होईल.
फायलनआधी भारतासाठी एक बॅडन्यूज आली आहे. अशा परिस्थितीत कर्णधार रोहित शर्मा आणि मुख्य प्रशिक्षक राहुल द्रविड प्लेइंग 11 मध्ये दोन मोठे बदल करून या दोन खेळाडूंना संधी देऊ शकतात.
टीम इंडिया वर्ल्ड कप 2023 ट्रॉफी जिंकण्यापासून एक पाऊल दूर आहे. पण अंतिम सामन्यापूर्वी एक वाईट बातमी समोर येत आहे की, सलामीवीर शुभमन गिल क्रॅम्पमुळे अंतिम सामन्यातून बाहेर पडू शकतो.
न्यूझीलंडविरुद्धच्या उपांत्य फेरीत गिल अडचणीत दिसला होता. मात्र, त्याच्या फिटनेसबाबत संघाकडून अद्याप कोणतेही वक्तव्य आलेले नाही. कारण टीम इंडियाकडे अंतिम सामन्यासाठी 2 दिवस बाकी आहेत, अशा स्थितीत गिल पूर्णपणे फिट होऊ शकतो.
दुसरा खेळाडू सूर्यकुमार यादव आहे. ज्याला अंतिम सामन्यातून बाहेरचा रस्ता दाखवला जाऊ शकतो. त्याला अनेक वेळा संधी देण्यात आली. उपांत्य फेरीत त्याला शेवटच्या षटकात 15 ते 20 धावा करण्याची संधी होती, पण सूर्या 2 चेंडू खराब करून बाद झाला. सूर्याच्या जागी संघात पंड्या परत येऊ शकतो.
अंतिम सामन्यात रोहित शर्मा आणि कंपनी पूर्ण नियोजनासह मैदानात उतरणार आहे. भारतीय संघ खेळपट्टी आणि परिस्थितीनुसार प्लेइंग-11 निवडू शकतो. कर्णधार रोहित शर्मा 2023 च्या विश्वचषक स्पर्धेत यापूर्वी अनेकदा असे करताना दिसला आहे. त्याने सुरुवातीच्या सामन्यात शार्दुल ठाकूर आणि अश्विनचा चांगला वापर केला.
क्रॅम्पमुळे गिल जर खेळला नाही तर इशान किशनला संधी मिळू शकते. खराब फॉर्ममध्ये झगडणाऱ्या सूर्यकुमार यादवला हटवून पंड्याला टीममध्ये संधी दिली जावू शकते. सूर्याने 1, 2, 22, 12, 49, 2 धावांची खेळी खेळून संघाचीच नव्हे तर चाहत्यांचीही निराशा केली आहे. हार्दिक पांड्या गोलंदाजीसोबत फलंदाजीतही संघासाठी महत्त्वाची भूमिका बजावू शकतो.