मुंबई : महाराष्ट्रात होत असलेल्या आयपीएल स्पर्धेच्या (Indian Premier League) सामन्यांसाठी स्पर्धेच्या सुरुवातीच्या दिवसांत स्टेडियममध्ये 25 टक्के प्रेक्षकांना उपस्थित राहण्याची परवानगी देण्यात आली आहे. याबाबत महाराष्ट्र सरकारने आपला निर्णय जाहीर केला आहे. आठ दिवसांनंतर परिस्थितीचा आढावा घेऊन स्टेडियममध्ये 50 टक्के प्रेक्षकांना परवानगी देण्याची राज्य सरकारची (Maharashtra Government) तयारी आहे. येत्या 26 मार्चपासून IPL सामन्यांना सुरूवात होणार आहे 22 मेपर्यंत ही स्पर्धा सुरू राहणार आहे. नगरविकास मंत्री एकनाथ शिंदे यांच्या अध्यक्षतेखाली आणि पर्यावरण मंत्री आदित्य ठाकरे (Aaditya Thackeray) यांच्या प्रमुख उपस्थितीत, तसेच मुंबई प्रीमियर लीगचे अध्यक्ष मिलिंद नार्वेकर यांच्या उपस्थितीत आज दुपारी 12:30 वाजता सह्याद्री अतिथी गृह येथे बैठक पार पडली. या बैठकीत स्टेडियममध्ये प्रेक्षकांच्या उपस्थितीस परवानगी देण्याचा निर्णय घेण्यात आला आहे.
महाराष्ट्रात होत असलेल्या आगामी IPL सामन्यांच्या आयोजनाबाबत या बैठकीत चर्चा करण्यात आली.या बैठकीला मुंबई पोलीस आयुक्त, महापालिका आयुक्त, मुंबई पोलीस दलातील उच्च पदस्थ अधिकारी यांच्यासह मुंबई क्रिकेट असोसिएशनचे (MCA) पदाधिकारी आणि BCCI चे CEO उपस्थित होते.
आयपीएल 2022 साठीचा महालिलाव तीन आठवड्यांपूर्वी पार पडला. आता प्रेक्षकांसह सर्व क्रिकेटपटूंना स्पर्धेचे वेध लागले आहेत. आयपीएल 2022 मधला पहिला सामना 26 मार्च रोजी वानखेडे स्टेडियमवर होणार आहे. चेन्नई सुपर किंग्स आणि कोलकाता नाईट रायडर्स रायडर्स (Chennai Super Kings vs Kolkata Knight Riders) हे आयपीएलच्या 15 व्या सीझनच्या पहिल्या सामन्यात (IPL 2022 Opening Match) भिडतील. चेन्नई सुपरकिंग्स हा संघ सध्या गतविजेता आहे. आत्तापर्यंत असे दिसून आले आहे की, आयपीएलचा पहिला सामना खेळण्याची संधी नेहमीच गतविजेत्या संघाला मिळते. त्यामुळे CSK ची निवड करण्यात आली आहे. दुसरीकडे, कोलकाता नाईट रायडर्स हा संघ गतवर्षी उपविजेता ठरला होता. हा संघ यंदाच्या आयपीएलमध्ये (IPL 2022) पहिल्या सामन्यात चेन्नईशी दोन हात करणार आहे. यावेळी आयपीएलचे लीग स्टेजचे सामने मुंबई आणि पुण्यातच खेळवले जाणार आहेत. आयपीएल 2022 मध्ये 10 संघ आहेत आणि ते प्रत्येकी पाचच्या दोन गटात विभागले गेले आहेत. सर्व संघ आपापसात किमान एक सामना नक्कीच खेळतील.
संघांना हॉटेलमधून सामने खेळताना आणि सरावासाठी जाताना रहदारीचा सामना करावा लागणार नाही. संघांच्या वाहतुकीसाठी रस्त्यांवर स्वतंत्र लेन असेल. मुंबईतील वानखेडे स्टेडियम, ब्रेबॉर्न स्टेडियम, नवी मुंबईतील डीवाय पाटील स्टेडियमवर 55 सामने खेळवले जाणार आहेत. याशिवाय 15 सामने पुण्यातील महाराष्ट्र क्रिकेट असोसिएशन स्टेडियमवर होणार आहेत. बीसीसीआयने सराव सुविधांसाठी वांद्रे-कुर्ला संकुल आणि ठाण्यातील दादोजी कोंडदेव स्टेडियमची निवड केली आहे.
मुंबई इंडियन्सचा संघ कोलकाता नाइट रायडर्स, राजस्थान रॉयल्स, दिल्ली कॅपिटल्स, लखनऊ सुपर जायंटस आणि चेन्नई सुपर किंग्स विरुद्ध प्रत्येकी दोन-दोन सामने खेळणार आहे. सनरायजर्स हैदराबाद, RCB, पंजाब किंग्स आणि गुजरात टायटन्स विरुद्ध प्रत्येकी एक-एक सामना खेळणार आहे.
दिल्ली कॅपिटल्स लीग स्टेजमध्ये मुंबई इंडियन्स, कोलकाता, राजस्थान रॉयल्स, लखनऊ सुपरजायंट्स आणि पंजाब किंग्स विरुद्ध प्रत्येकी 1-1 सामना खेळणार आहे. चेन्नई, हैदराबाद, बंगलोर आणि गुजरात विरुद्ध प्रत्येकी 1-1 सामना होईल.
चेन्नई सुपरकिंग्सची टीम मुंबई इंडियन्स, सनरायजर्स हैदराबाद, आरसीबी, पंजाब किंग्स और गुजरात विरुद्ध 2-2 सामने खेळणार आहे. कोलकाता, राजस्थान, दिल्ली आणि लखनऊ विरुद्ध 1-1 सामना होणार आहे.
बंगलोरचा संघ मुंबई, कोलकाता, दिल्ली, लखनऊ विरुद्ध 1-1 मॅच खेळणार आहे. राजस्थान, चेन्नई, हैदराबाद, पंजाब आणि गुजरात विरुद्ध 2-2 सामने खेळणार आहे.
इतर बातम्या
Rohit Sharma: ‘रोहित शर्मा आज संघात आहे कारण…’ एका मोठ्या क्रिकेटपटूने उपस्थित केलं प्रश्नचिन्ह
Russia Ukraine War: रशियन फौजांच्या हल्ल्यातून थोडक्यात बचावलं केविन पीटरसनचं कुटुंब