केपटाऊन: भारत आणि दक्षिण आफ्रिकेमध्ये सुरु असलेली कसोटी मालिका 1-1 अशी बरोबरीत आहे. त्यामुळे तिसऱ्या कसोटीत या मालिकेचा निकाल अपेक्षित आहे. केप टाऊनच्या न्यूलँडस येथे हा कसोटी सामना खेळला जाणार आहे. न्यूलँडसची खेळपट्टी वेगवान गोलंदाजांना मदत करणारी आहे. त्यामुळे जोहान्सबर्गमध्ये झालेल्या चूका सुधारुन भारतीय गोलंदाजांना या कसोटीत टिच्चून मारा करावा लागेल. दुसऱ्या कसोटीत मोहम्मद सिराजला हॅमस्ट्रिंगची दुखापत झाली होती. त्यामुळे तो केप टाऊन कसोटीत खेळण्याची शक्यता कमी आहे. अशा परिस्थितीत राहुल द्रविड आणि विराट कोहलीला इशांत शर्मा आणि उमेश यादवपैकी एकाची निवड करावी लागेल. (3rd Test at Cape Town Rahul Dravid-Virat Kohli to Take Call on Ishant Sharma or Umesh Yadav For Mohammed Siraj)
पाठीच्या दुखण्यामुळे विराट कोहली मागच्या कसोटीत खेळला नव्हता. तो तिसऱ्या कसोटीत खेळणार आहे. त्यामुळे संघाला आणखी बळकटी मिळेल. हनुमा विहारीच्या जागी कोहली संघात येणार आहे. वाँडर्सच्या दोन्ही डावात विहारीने चांगली फलंदाजी केली होती.
दक्षिण आफ्रिका विजयी संघात काही बदल करण्याची शक्यता कमी आहे. पण भारतीय टीम मॅनेजमेंटसमोर संघनिवडीचा पेच असणार आहे. इशांत की, उमेश? मागच्या कसोटीत उमेश की, शार्दुल असा प्रश्न होता. पण शार्दुलने बॅट आणि बॉलने कमाल दाखवत हा प्रश्नच निकाली काढला.
संबंधित बातम्या:
Rohit Sharma| रोहित शर्माची भावनिक बाजू, पोस्ट केला इमोशनल VIDEO
Sachin Tendulkar: ‘सचिनला प्रश्न विचारणारे आपण कोण?’ मायकल वॉनची थेट ‘क्रिकेटच्या देवाला’ नडण्याची भाषा
Shardul Thakur: ‘झुकती है दुनिया झुकानेवाला…’, आपल्या लॉर्ड शार्दुल ठाकूरसमोर झुकला हा दिग्गज क्रिकेटपटू
(3rd Test at Cape Town Rahul Dravid-Virat Kohli to Take Call on Ishant Sharma or Umesh Yadav For Mohammed Siraj)