मुंबई: सध्या सूर्यकुमार यादव T20 क्रिकेटमधला टॉप बॅट्समन आहे. वर्ल्ड टी 20 रँकिंगमध्ये तो पहिल्या स्थानावर आहेच. पण सध्या ऑस्ट्रेलियात चालू असलेल्या टी 20 वर्ल्ड कपमध्ये सूर्यकुमार नावाच्या वादळात भल्या-भल्या टीम्सची वाताहात होत आहे. सूर्यकुमार यादवला रोखणं, हे आज प्रत्येक टीमसमोरच मोठ चॅलेंज आहे. वेगवान धावा आणि सहजतेने बॅटिंग हे सूर्यकुमार यादवच्या फलंदाजीच वैशिष्टय आहे. सूर्यकुमार यादव हा T20 क्रिकेटमधला Best बॅट्समन का आहे? ते या 5 पॉइंटसमधून समजून घ्या.
परिस्थितीशी जुळवून घेण्याच कौशल्य
सूर्यकुमार यादव हा भरवसा ठेवता येईल, असा खेळाडू आहे. नवीन वातावरण, नवीन बॉलर्स, दबाव आणि नवीन चॅलेंजेस असताना सुद्धा सूर्यकुमार यादव नेहमी स्थिर असतो. तो मुक्तपणे आणि सहजतेने बॅटिंग करतो. पर्थवर दक्षिण आफ्रिके सारख्या मातब्बर टीमविरुद्ध त्याने 40 चेंडूत 68 धावांची खेळी केली होती.
झिम्बाब्वे विरुद्धच्या सामन्यानंतर राहुल द्रविड यांनी ‘अविश्वसनीय’ या एका शब्दात सूर्यकुमारच्या खेळाचं कौतुक केलं होतं.
मिस्टर 360
क्रिकेटच्या पुस्तकातील आणि त्याच्या पलीकडचे सगळे फटके सूर्यकुमार यादवच्या भात्यात आहेत. क्रीजमध्ये असताना सूर्यकुमार ज्या कौशल्याने, चपळाईने हालचाली करतो त्याला तोड नाही. विकेटच्या समोर कमी आणि मागे तो जास्त धाव करतो. थर्डमॅन, फाइन लेग क्षेत्रात सूर्यकुमार यादवचा गेम अविश्सनीय आहे. मूळात म्हणजे या शॉटवर तो फोर, सिक्स वसूल करतो. म्हणूनच त्याला भारताच मिस्टर 360 म्हटलं जातं.
शाळेत असताना सूर्यकुमार हार्ड सिमेंटच्या ट्रॅकवर रबर बॉल क्रिकेट खेळलाय. आता लेदर क्रिकेटमध्येही त्याला याची मदत होतेय.
स्ट्राइक रेट
टी 20 फॉर्मेटमध्ये वेगवान धावा जमवण्याबरोबर स्ट्राइक रेट महत्त्वाचा असतो. सूर्यकुमार यादव त्यात एकदम परफेक्ट आहे. कठीण प्रसंगात फलंदाजीला येऊन सामना फिरवण्याची क्षमता त्याच्यात आहे.
सूर्यकुमार यादवने यावर्षी टी 20 क्रिकेटमध्ये 1000 हजार धावांचा टप्पा ओलांडला. अशी कामगिरी करणारा तो एकमेव आंतरराष्ट्रीय फलंदाज आहे. 186.54 च्या स्ट्राइक रेटने त्याने या धावा केल्या.
दबाावाखील उत्तम कामगिरी
सूर्यकुमार यादव चौथ्या क्रमांकावर फलंदाजीला येतो. या क्रमांकावर फलंदाजी करताना दोन आव्हान असतात. एकतर खराब सुरुवातीमुळे टीमचा संघर्ष सुरु असतो किंवा टीमला जबरदस्त सुरुवात मिळाली असेल, तर तो वेग कायम ठेवायचा असतो.
सूर्यकुमार यादवच्या भात्यात अनेक फटके आहेत. त्यामुळे तो गरजेनुसार लगेच जुळवून घेतो. उच्च फलंदाजीच्या क्षमतेमुळे तो सहजतेने वेगाने धावा बनवतो. त्यामुळे दुसऱ्या प्लेयवर दबाव राहत नाही.
मॅच विनर
सूर्यकुमार यादवला 2021 मध्ये टी 20 क्रिकेट फॉर्मेटमध्ये आंतरराष्ट्रीय पदार्पणाची संधी मिळाला. त्याआधी त्याने बराच संयम बाळगून मेहनत केली. सध्याच्या घडीला सूर्यकुमार भरवशाचा क्रिकेटपटू आहे. तो सध्या टीम इंडियाची रनमशीन बनलाय. सामना कुठल्याही स्थितीत असला, तरी सूर्यकुमार यादव फलंदाजीला आल्यानंतर चित्रच बदलून जातं. आपल्या टीमसाठी तो अनेक मॅच विनिंग इनिंग्स खेळल्या आहेत.