T20 World Cup मध्ये 7 भारतीय क्रिकेटपटूंचं पदार्पण, पाकिस्तानला भिडून चौघे दाखवणार रुबाब
टी - 20 विश्वचषकासाठी भारताने 15 खेळाडूंची निवड केली आहे, त्यापैकी 7 भारतीय खेळाडू असे आहेत, जे पहिल्यांदाच या स्पर्धेचा भाग असतील. म्हणजेच, आयसीसी टी-20 विश्वचषक 2021 मध्ये त्यांचे पदार्पण दिसेल.
1 / 8
क्रिकेट म्हटलं की साहस आणि रोमांच आला. नुकतीच आयपीएल 2021 स्पर्धा संपल्यामुळे क्रिकेटरसिक निराश झाले असतील, परंतु निराश होण्याची गरज नाही. कारण आता आयपीएलपेक्षा मोठी स्पर्धा सुरु होतेय. या स्पर्धेत तर भारत त्यांचा पारंपरिक प्रतिस्पर्धी पाकिस्तानशी दोन हात करणार आहे. आयसीसीने मान्यता दिलेल्या या मोठ्या स्पर्धेचे काऊंटडाऊन सुरू झाले आहे. भारत हा या स्पर्धेचा यजमान आहे आणि विजयाचा सर्वात मोठा दावेदार आहे. टी - 20 विश्वचषकासाठी भारताने 15 खेळाडूंची निवड केली आहे, त्यापैकी 7 भारतीय खेळाडू असे आहेत, जे पहिल्यांदाच या स्पर्धेचा भाग असतील. म्हणजेच, आयसीसी टी-20 विश्वचषक 2021 मध्ये त्यांचे पदार्पण दिसेल. त्या 7 भारतीयांपैकी चौघांचे पदार्पण 24 ऑक्टोबर रोजी पाकिस्तानविरुद्धच्या सामन्याद्वारे होईल, असं वाटतंय. चला तर मग या 7 भारतीय खेळाडूंवर एक एक नजर टाकूया, जे पहिल्यांदाच टी -20 विश्वचषक संघाचा भाग बनले आहेत.
2 / 8
केएल राहुल (KL Rahul) : भारतासाठी 49 टी -20 सामने खेळल्यानंतर उजव्या हाताचा फलंदाज केएल राहुल पहिल्यांदाच टीम इंडियाच्या टी-20 विश्वचषक संघाचा भाग बनला आहे. त्याचा अलीकडील फॉर्म आश्चर्यकारक आहे. तो आयपीएल 2021 च्या यशस्वी फलंदाजांपैकी एक होता, जिथे त्याने 13 सामन्यांमध्ये 6 अर्धशतकांसह 626 धावा केल्या आहेत. ओपनिंगसह केएल राहुलकडे मधल्या फळीत उतरून चांगली खेळी करण्याची त्याच्यात क्षमता आहे. आयपीएल 2021 मध्ये पंजाब किंग्ससाठी सलामी देताना राहुल ज्या प्रकारे यूएईच्या खेळपट्ट्यांवर खेळला आहे, ते पाहता त्याला पाकिस्तानविरुद्धच्या सामन्यात रोहित शर्माचा सलामीचा जोडीदार बनवता येईल.
3 / 8
ऋषभ पंत (Rishabh Pant) : प्रत्येक फॉरमॅटमध्ये टीम इंडियाचा विश्वासार्ह यष्टीरक्षक बनलेला ऋषभ पंत आपला पहिला टी -20 विश्वचषक खेळताना दिसणार आहे. त्याने भारतासाठी 33 टी -20 सामने खेळले आहेत. आयपीएल 2021 मध्ये पंतने 3 अर्धशतकांसह 419 धावा केल्या आहेत. पाकिस्तानविरुद्धच्या प्लेइंग इलेव्हनमध्ये विकेटकीपर फलंदाज म्हणून कर्णधार कोहलीची पहिली पसंती ऋषभ पंतच्या नावालाच असू शकते.
4 / 8
सूर्यकुमार यादव (Surya Kumar Yadav): सूर्यकुमार यादव हा उजव्या हाताचा फलंदाज आहे ज्याला आंतरराष्ट्रीय स्तरावर फक्त 4 टी -20 सामन्यांचा अनुभव आहे. अनुभव नक्कीच जास्त नाही, पण क्षमता भरपूर आहे. याच कारणामुळे त्याला इतका लवकर पहिला टी 20 विश्वचषक खेळण्याची संधी मिळत आहे. पाकिस्तानविरुद्ध सूर्यकुमार मधल्या फळीत टीम इंडियाची पहिली पसंती ठरू शकतो. सूर्यकुमार यादवने आयपीएल 2021 च्या 14 सामन्यांमध्ये 317 धावा केल्या आहेत. आयपीएलच्या उत्तरार्धात तो निश्चितच त्याच्या फॉर्मशी संघर्ष करताना दिसला. पण मुंबई इंडियन्सच्या शेवटच्या सामन्यात त्याने 40 चेंडूत 82 धावांची खेळी खेळून फॉर्ममध्ये परतण्याचा पुरावा दिला होता.
5 / 8
इशान किशन (Ishan Kishan) : इशान किशनला आंतरराष्ट्रीय खेळपट्टीवर अनेक टी -20 सामने खेळण्याचा अनुभव नाही. तो फक्त 3 सामने खेळला आहे. असे असूनही, तो आपला पहिला टी -20 विश्वचषक खेळण्यास सज्ज आहे. आयपीएल 2021 च्या खेळपट्टीवर त्याचा पहिला हाफ चांगला गेला. पण उत्तरार्धात त्याच्या खराब फॉर्ममुळे प्रत्येकाची चिंता वाढली. तथापि, चांगली गोष्ट म्हणजे त्याच्या फ्रँचायझी मुंबई इंडियन्सचा प्रवास थांबण्यापूर्वी त्याने त्याच्या फॉर्ममध्ये परत आल्याची चिन्हे दाखवली होती. त्याने सनरायझर्सविरुद्ध शेवटच्या सामन्यात अवघ्या 32 चेंडूत 84 धावांची धडाकेबाज खेळी केली. ईशान किशनची टी -20 विश्वचषक टीम इंडियामध्ये भूमिका सलामीवीराची असणार आहे.
6 / 8
वरूण चक्रवर्ती (Varun Chakravarthy) : आयपीएल 2021 मध्ये वरुणच्या नावावर 18 विकेट्स आहेत. तो एक मिस्ट्री मॅन म्हणून उदयास आला आहे. ऑईन मॉर्गनच्या शब्दात, वरुण चक्रवर्ती हा आयपीएलचा सर्वात मोठा शोध आहे. वरुण चक्रवर्ती भारतासाठी फक्त 3 टी -20 सामने खेळला आहे. तो आता त्याचा पहिला टी - 20 विश्वचषक खेळण्यासाठी सज्ज आहे. भारताच्या पाकिस्तानविरुद्धच्या पहिल्या सामन्यात खेळणाऱ्या इलेव्हनमध्ये या मिस्ट्री स्पिनरचा प्रवेश निश्चित असल्याचे मानले जात आहे.
7 / 8
राहुल चाहर
8 / 8
शार्दुल ठाकुर (Shardul Thakur) : आंतरराष्ट्रीय खेळपट्टीवर भारतासाठी 22 टी - 20 सामने खेळलेला शार्दुल ठाकूर या वेळी पहिला टी - 20 विश्वचषकही खेळणार आहे. तो या स्पर्धेत भारताचे घातक अस्त्र ठरेल. शार्दुल आयपीएल 2021 मध्ये चेन्नई सुपर किंग्जचा सर्वात यशस्वी गोलंदाज आहे.