मुंबई: आज संपूर्ण देशात आजादी का अमृत महोत्सव साजरा होत आहे. देशाच्या स्वातंत्र्याला 75 वर्ष पूर्ण झाली आहेत. अन्य देशवासियांप्रमाणे भारतीय क्रिकेटपटुंनी झिम्बाब्वे मध्ये जोश आणि उत्साहात स्वातंत्र्यदिन साजरा करत आहेत. शिखर धवनने भारतासाठी एक मेसेज पोस्ट केला आहे. केएल राहुलच्या नेतृत्वाखाली भारतीय संघ झिम्बाब्वे मधील दूतावासात जाऊन स्वातंत्र्यदिन साजरा करणार आहे. येत्या गुरुवारी भारत आणि झिम्बाब्वे मध्ये पहिला सामना खेळला जाणार आहे.
75 व्या स्वातंत्र्यदिनाच्या निमित्ताने टीम इंडियाचे स्टार हरारे येथील भारतीय दूतावासात उपस्थित रहाणार आहेत. आठवडाअखेरीस भारतीय संघ हरारे मध्ये दाखल झाला. रविवारी कुलदीप यादव संघासोबत दाखल झाला.
आप सभी को स्वतंत्रता दिवस की हार्दिक शुभकामनाएं। जय हिंद ?? #IndiaAt75 #IndependenceDay2022 pic.twitter.com/T8QDvihXr4
— Shikhar Dhawan (@SDhawan25) August 15, 2022
हरारे मध्ये दाखल झाल्यानंतर रविवारी भारतीय संघाच पहिलं सराव सत्र पार पडलं. उपकर्णधार शिखर धवन, दीपक चाहर आणि ऋतुराज गायकवाड सर्व प्रॅक्टिस करताना दिसले. रविवारी आल्यामुळे कॅप्टन केएल राहुल आणि कुलदीप यादव अनुपस्थित होते.