IPL Auction 2022: हर्षल-शार्दुल नव्हे ‘या’ 29 वर्षाच्या मुलावर पडेल पैशांचा पाऊस, त्याच्यासाठी लागेल कोटयावधींची बोली
आयपीएलच्या मागच्या सीजनमध्ये हर्षल पटेल आणि नुकत्याच संपलेल्या दक्षिण आफ्रिका दौऱ्यात शार्दुल ठाकूरने दमदार कामगिरी केली. पण भारताचे माजी क्रिकेटपटू आकाश चोप्रा यांच्या मते या दोघांऐवजी एका 29 वर्षाच्या युवा गोलंदाजावर सर्वाधिक बोली लागेल.
1 / 10
इंडियन प्रिमियर लीगसाठी (IPL) लवकरच मेगा ऑक्शन पार पडणार आहे. यामध्ये अनेक ताज्या दमाच्या क्रिकेटपटुंवर कोट्यवधींची बोली लागेल. प्रत्येक फ्रेंचायजीला फक्त चार खेळाडू रिटेन करण्याचा अधिकार होता. त्यामुळे प्रत्येक टीम नव्याने मजबूत संघबांधणी करण्याचा प्रयत्न करेल. लिलावात फलंदाजांइतकीच गोलंदाजांवरही बोली लागेल.
2 / 10
आयपीएलच्या मागच्या सीजनमध्ये हर्षल पटेल आणि नुकत्याच संपलेल्या दक्षिण आफ्रिका दौऱ्यात शार्दुल ठाकूरने दमदार कामगिरी केली. पण भारताचे माजी क्रिकेटपटू आकाश चोप्रा यांच्या मते या दोघांऐवजी एका 29 वर्षाच्या युवा गोलंदाजावर सर्वाधिक बोली लागेल.
3 / 10
आयपीएलमधला तो सर्वात महागडा गोलंदाज ठरु शकतो, असा अंदाज वर्तवला आहे. येत्या 12 आणि 13 फेब्रुवारीला आयपीएलसाठी लिलाव प्रक्रिया पार पडणार आहे. प्रत्येक संघ त्याचीच रणनिती आखत आहे.
4 / 10
2021 च्या सीजनमध्ये हर्षल पटेलने पर्पल कॅप मिळवली होती. त्याने RCB कडून खेळताना 32 विकेट घेतल्या होत्या. पण तरीही आरसीबीने त्याला रिटेन केलेलं नाही.
5 / 10
दुसऱ्याबाजूला शार्दुलने नुकत्याच संपलेल्या दक्षिण आफ्रिका दौऱ्यात दमदार कामगिरी केली. संघाला गरज असताना विकेट मिळवून दिल्या व धावा सुद्धा केल्या. ऑलराऊंडर म्हणून त्याने आपली उपयुक्तता सिद्ध केली. पण आकाश चोप्रा यांच्यामते या दोघांऐवजी त्याच 29 वर्षाच्या गोलंदाजला विकत घेण्यासाठी आयपीएलच्या फ्रेंचायजींमध्ये चुरस असेल.
6 / 10
हर्षल पटेल महागडा गोलंदाज ठरणार नाही असे चोप्रा यांना वाटते. त्यांनी आय़पीएलमध्ये महागडे ठरु शकतील अशा पाच गोलंदाजांच्या यादीत शार्दुलला स्थान दिलेलं नाही.
7 / 10
प्रसिद्ध कृष्णा, आवेश खान, राहुल चहर, दीपक चहर आणि युजवेंद्र चहल हे यंदाच्या आयपीएलमध्ये पाच महागडे गोलंदाज ठरतील असा आकाश चोप्रा यांचा अंदाज आहे. दीपक चहर सर्वात महागडा गोलंदाज ठरेल, असे चोप्रा यांचे मत आहे.
8 / 10
"सर्वप्रथम दीपक चहर नव्या चेंडूवर विकेट घेऊ शकतो. अशा प्रकारची गोलंदाजी करणारा सध्या दुसरा भारतीय गोलंदाज नाहीय. तुम्ही भुवनेश्वर कुमार, संदीप वॉरियर, शिवम मावी यांचा विचार करु शकता.
9 / 10
मागच्या सीजनमध्ये 32 विकेट घेऊन पर्पल कॅप मिळवणाऱ्या हर्षल पटेलसोबत मी जाणार नाही. तो महागडा गोलंदाज ठरेल, असं मला वाटत नाही" असे आकाश चोप्राने त्याच्या युट्यूब चॅलनवर सांगितलं.
10 / 10
"पावरप्लेमध्ये विकेट मिळवून देण्याची दीपक चहरमध्ये क्षमता आहे. फलंदाजी सुद्धा तो करु शकतो. दक्षिण आफ्रिकेत वनडे मालिकेत हे दिसलं आहे. प्रत्येक फ्रेंचायजी दीपक चहरला आपल्या ताफ्यात घेण्याचा प्रयत्न करेल" असे आकाश चोप्रा यांचा अंदाज आहे.