VIDEO : अफलातून कॅच, बॅट्समनलाही विश्वास नाही बसला

| Updated on: Jan 28, 2023 | 3:45 PM

प्रसिद्ध बिग बॅश लीग अंतिम टप्प्यावर आहे. शनिवारी सिडनी सिक्सर्स आणि पर्थ स्क्रोचर्समध्ये क्वालिफायरचा सामना झाला. या मॅचमध्ये सुरुवातीलाच फिल्डरन जबरदस्त कॅच पकडली.

VIDEO : अफलातून कॅच, बॅट्समनलाही विश्वास नाही बसला
bbl
Image Credit source: Getty Images
Follow us on

सिडनी – प्रसिद्ध बिग बॅश लीग अंतिम टप्प्यावर आहे. शनिवारी सिडनी सिक्सर्स आणि पर्थ स्क्रोचर्समध्ये क्वालिफायरचा सामना झाला. या मॅचमध्ये सुरुवातीलाच फिल्डरन जबरदस्त कॅच पकडली. बॅट्समनला विश्वास बसला नाही. सिडनीच्या टीमने टॉस जिंकून बॅटिंगचा निर्णय घेतला. टीमला चांगल्या सुरुवातीची गरज होती. पण अशी सुरुवात मिळाली नाही. कॅप्टन मोइजेज हेनरिक्सला लवकर बॅटिंगसाठी मैदानात उतराव लागलं.

पहिल्याच ओव्हरमध्ये टीमला झटका

पहिल्याच ओव्हरमध्ये सिडनी टीमला झटका बसला. जेसन बेहरनडॉर्फने पहिल्याच ओव्हरच्या चौथ्या चेंडूवर विकेट काढली. ऑस्ट्रेलियासाठी तो 12 वनडे आणि नऊ टी 20 सामने खेळलाय. जॉश फिलिपला स्वस्तात पॅव्हेलियनमध्ये पाठवलं. हा बॅट्समन एक रन्स करुन बोल्ड झाला.

हार्डीने पकडली उत्कृष्ट कॅच

जेसन बेहरनडॉर्फनेच सिडनीला दुसरा धक्का दिला. यात फिल्डरच महत्त्वाच योगदान होतं. हार्डीने उत्कृष्ट क्षेत्ररक्षणाचा नमुना दाखवला. हार्डिच्या अप्रतिम फिल्डिंगमुळे कुर्टिस पॅटरसनला पॅव्हेलियनची वाट पकडावी लागली. बेहरनडॉर्फने चौथा चेंडू शॉर्ट टाकला. समोर डावखुरा फलंदाज पॅटरसन होता. त्याने चेंडूवर पुलचा फटका खेळला. चेंडूला मिडऑनच्या वरुन मारण्याचा प्रयत्न केला. तिथे हार्डी उभा होता. त्याने तात्काळ चेंडू जज केला. त्याने योग्य वेळी डाइव्ह मारुन एकाहाताने कॅच पकडली.


कॅच घेताना हार्डीचे दोन्ही पाय हवेत होते. हात पाठीमागच्या बाजूला होता. या कॅचमुळे सिडनीचे प्लेयर्स आनंदी होते. पण पॅटरसनच्या चेहऱ्यावर हैराणीचे भाव होते. पुन्हा आऊट झाल्याची निराशा स्पष्ट दिसत होती. 11 चेंडूत एक चौकार मारुन त्याने सहा धावा केल्या.

स्मिथकडून निराशा

ऑस्ट्रेलियाचा स्टीव स्मिथ सध्या शानदार फॉर्ममध्ये आहे. ऑस्ट्रेलियाच्या सर्वोत्तम फलंदाजांमध्ये स्मिथची गणना होते. बीबीएलमध्ये त्याने सलग दोन शतकं झळकवली आहेत. पण क्वालिफायर मॅचमध्ये त्याने निराश केलं. त्याच्याकडून या मॅचमध्ये मोठ्या इनिंगची अपेक्षा होती. पण स्मिथ 16 चेंडूत 18 धावा करुन आऊट झाला. या दरम्यान त्याने एक सिक्स मारला. डेविड पायने त्याचा विकेट घेतला. डेविडने आपल्याच गोलंदाजीवर स्मिथचा झेल घेतला.