AB de Villiers Retirement : एबी डिव्हिलियर्सची निवृत्तीची घोषणा, आयपीएलमध्येही खेळणार नाही

| Updated on: Nov 19, 2021 | 4:50 PM

दक्षिण आफ्रिकेचा महान फलंदाज एबी डिव्हिलियर्सने क्रिकेटला अलविदा केला आहे. एबी डिव्हिलियर्सने 2018 मध्ये आंतरराष्ट्रीय क्रिकेटमधून निवृत्ती घेतली होती, पण आता या दिग्गज खेळाडूने फ्रेंचायझी क्रिकेटलाही अलविदा म्हटले आहे.

AB de Villiers Retirement : एबी डिव्हिलियर्सची निवृत्तीची घोषणा, आयपीएलमध्येही खेळणार नाही
AB de Villiers
Follow us on

मुंबई : दक्षिण आफ्रिकेचा महान फलंदाज एबी डिव्हिलियर्सने क्रिकेटला अलविदा केला आहे. एबी डिव्हिलियर्सने 2018 मध्ये आंतरराष्ट्रीय क्रिकेटमधून निवृत्ती घेतली होती, पण आता या दिग्गज खेळाडूने फ्रेंचायझी क्रिकेटलाही अलविदा म्हटले आहे. म्हणजेच आता एबी डिव्हिलियर्स आयपीएलमध्ये खेळणार नाही, तसेच तो बिग बॅश, पीएसएल किंवा इतर कोणत्याही लीगमध्ये खेळताना दिसणार नाही. एबी डिव्हिलियर्सने सोशल मीडियावर निवृत्तीची घोषणा केली आहे. डिव्हिलियर्सने लिहिले की, ‘माझा प्रवास खूप छान होता, आता मी क्रिकेटमधून पूर्णपणे निवृत्ती घेण्याचा निर्णय घेतला आहे. मी माझ्या घरामागे माझ्या मोठ्या भावांसोबत खेळायला सुरुवात केली आणि तेव्हापासून आजपर्यंत मी हा खेळ खूप एन्जॉय केला आहे. आता वयाच्या 37 व्या वर्षी ती आग पूर्वीसारखी धगधगत नाही. (AB de Villiers announces retirement, will not play in IPL)

एबी डिव्हिलियर्सने सोशल मीडियावर निवृत्तीची घोषणा केली. संन्यासाबाबतच्या ट्विटमध्ये डिव्हिलियर्सने पोस्ट केलेल्या फोटोमध्ये हिंदीत धन्यवाद लिहिले आहे. डिव्हिलियर्सने लिहिले की, “माझा प्रवास खूप छान होता, आता मी क्रिकेटमधून पूर्णपणे निवृत्ती घेण्याचा निर्णय घेतला आहे. मी माझ्या घरामागे माझ्या मोठ्या भावांसोबत खेळायला सुरुवात केली होती आणि तेव्हापासून आजपर्यंत मी हा खेळ खूप एन्जॉय केला आहे. आता वयाच्या 37 व्या वर्षी ती आग इतक्या वेगाने किंवा पूर्वीसारखी धगधगत नाही.

एबी डिव्हिलियर्सने आपल्या संपूर्ण टी-20 कारकिर्दीत 9424 धावा केल्या आहेत. डिव्हिलियर्सने क्रिकेटच्या सर्वात लहान फॉरमॅटमध्ये 4 शतके, 69 अर्धशतके ठोकली आहेत. 340 टी-20 सामन्यांमध्ये त्याची फलंदाजीची सरासरी 37.24 होती जी खरोखरच प्रशंसनीय आहे. मिस्टर 360 डिग्री या नावाने प्रसिद्ध असलेल्या डीव्हिलियर्सने आपल्या टी-20 कारकिर्दीत 436 षटकार ठोकले. यासोबतच त्याने 230 झेलही घेतले आहेत.

बंगळुरूला मोठा धक्का

एबी डिव्हिलियर्स आयपीएलमध्ये रॉयल चॅलेंजर्स बंगळुरूचा सर्वात मोठा सामना मॅचविनर खेळाडू होता. मेगा ऑक्शनपूर्वी बंगळुरूला निश्चितपणे त्याला संघात कायम ठेवायचे होते, परंतु डिव्हिलियर्सने अचानक निवृत्ती घेऊन सर्वांना आश्चर्यचकित केले आहे. डिव्हिलियर्सने आयपीएलमध्ये 184 सामन्यांमध्ये 39.71 च्या सरासरीने 5162 धावा केल्या आहेत. डिव्हिलियर्सचा स्ट्राईक रेट 151 पेक्षा जास्त होता आणि त्याच्या बॅटने 3 शतके, 40 अर्धशतके झळकावली आहेत.

डिव्हिलियर्सच्या निवृत्तीनंतर रॉयल चॅलेंजर्स बँगलोरने एक भावनिक ट्विट केले आहे. आरसीबीने लिहिले, ‘एबी डिव्हिलियर्सने क्रिकेटमधून निवृत्ती घेतली आहे. एका युगाचा अंत झाला आहे. एबी तुझ्यासारखा कोणीच नाही. आरसीबीमध्ये आम्हाला तुझी खूप आठवण येईल. तू संघासाठी, चाहत्यांसाठी जे काही केलं आहेस, त्यासाठी तुला खूप प्रेम, हॅप्पी रिटायरमेंट लीजेंड (निवृत्तीच्या शुभेच्छा).

इतर बातम्या

IND vs NZ: रोहित शर्माने डगआउटमध्ये जखमी मोहम्मद सिराजला मारलं, VIDEO व्हायरल

नाद करा पण आमचा कुठं! गप्टीलने डोळे दाखवले, दीपक चाहरने पुढच्या बॉलवर विकेट घेतली, पाहा VIDEO

IND vs NZ, 2nd T20, LIVE Streaming: टीम इंडियाला न्यूझीलंड विरुद्ध मालिका विजयाची संधी, मॅच कुठं पाहणार?

(AB de Villiers announces retirement, will not play in IPL)