मुंबई : टीम इंडियाचा माजी खेळाडू गौतम गंभीर आणि एस श्रीसंत यांच्या झालेल्या राड्याची देशभरात चर्चा आहे. गौतम गंभीर निवृत्त झाला असला तरी एखाद्या तरूण नव्या दमाच्या खेळाडूसारखा भांडताना दिसला. बुधवारी सूरतमध्ये लीजेंड लीगमधील इंडिया कॅपिटल्स आणि गुजरात जायंट्स यांच्यात झालेल्या एलिमिनेटर सामन्यामध्ये हा राडा पाहायला मिळाला. या वादानंतर एस श्रीसंत याने व्हिडीओ शेअर केले असून त्याामध्यी नवनवीन खुलासे केले आहेत. या वादानंतर सर्वांना प्रश्न पडला होता की गौतम गंभीर श्रीसंतला नेमकं काय म्हणाला? श्रीसंतने इन्स्टाग्रामवर लाईव्ह येत याचाही खुलासा केला आहे.
या वादावेळी गौतम गंभीर मला फिक्सर म्हणत होता त्यासोबतच त्याने मला शिवीगाळ केली होती. यावर मी त्याला वारंवार इतकंच विचारत होती की, तु मला फिक्सर फिक्सर का बोलत आहे. पण तो मला फिक्सर बोलत शिवीगीळ करत असल्याचं श्रीसंतने लाईव्ह येत सांगितलं आहे. इतकंच नाहीतर पंचासमोर मला गंभीर फिक्सर बोलत असल्याचंही श्रीसंत म्हणाला.
काही कारण नसताना तो माझ्याशी भांडला असून तो जे काही बोललाय ते खूप वाईट होतं. तशा प्रकारे गंभीरने माझ्याशी बोलायला नव्हतं पाहिजे. संघातील वीरेंद्र सेहवागसह इतर सहकाऱ्यांचाही तो आदर करायचा नाही. जेव्हा शोवळी गंभीरला विराटबद्दल विचारलं जातं तेव्हा तो त्याच्याबद्दल बोलत नाही. जर तुम्ही संघातील खेळाडूंचा आदर करू शकत नसाल तर लोकांचं प्रतिनिधित्त्व करण्याला काय अर्थ असल्याचं श्रीसंतने म्हटलं होतं.
दरम्यान, 2013 मध्ये आयपीएल स्पॉट फिक्सिंगच्या आरोपाखाली श्रीसंतवर आजीवन बंदी घालण्यात आली होती. मात्र न्यायालयाने त्याला क्लीन चीट दिली असून तो देशांतर्गत क्रिकेट, लीजेंड लीगमध्ये खेळत आहे. गंभीर फिक्सर बोलल्याने त्याच्यावर काही कारवाई होते का? याकडे सर्व क्रिकेट चाहत्यांचं लक्ष लागलं आहे.