मुंबई : अभिनयाकडून राजकारणाकडे वळलेली पायल घोष सध्या चर्चेत आहे. अलीकडेच पायल घोष हेडलाइन्सचा विषय बनलेली. कारणही त्यामागे तसच होतं. तिने क्रिकेटपटू मोहम्मद शमीला थेट लग्नाची मागणी घातली. त्यामुळे पायल घोष हे नाव सोशल मीडियावर चर्चेत आलं. “शमी तू तुझं इंग्लिश सुधार, मी तुझ्याशी लग्नाला तयार आहे” असं तिने X वर म्हटलं आहे. X म्हणजे आधीच टि्वटर. तिने हा मेसेज पोस्ट करताना दोन लाफिंग इमोजी पोस्ट केले होते. आता पायल घोषने पुन्हा एक नवीन पोस्ट केली आहे. ज्याने नेटीझन्सच लक्ष वेधून घेतलय. मोहम्मद शमी सध्या प्रचंड फॉर्ममध्ये आहे. वनडे वर्ल्ड कप 2023 च्या प्रत्येक सामन्यात तो जबरदस्त प्रदर्शन करतोय. मोहम्मद शमीची गोलंदाजी खेळणं कुठल्याही प्रतिस्पर्धी टीमला जमत नाहीय.
मोहम्मद शमी हा वनडे वर्ल्ड कपमध्ये सर्वाधिक विकेट घेणारा भारतीय गोलंदाज बनला आहे. त्याने 14 सामन्यात 45 विकेट घेतलेत. त्याने झहीर खान आणि जवागल श्रीनाथ या दोन भारतीय गोलंदाजांचा वर्ल्ड कपमधला 44 विकेट घेण्याचा रेकॉर्ड मोडला. मोहम्मद शमीला सुरुवातीला संधी मिळाली नव्हती. पण न्यूझीलंड विरुद्धच्या सामन्यात संधी मिळाल्यापासून मोहम्मद शमी फॉर्ममध्ये आहे. प्रत्येक सामन्यात त्याने पाच-चार अशाच विकेट काढल्या आहेत. मोहम्मद शमीची आग ओकणारी गोलंदाजी खेळणं कुठल्याही फलंदाजासाठी सोप नाहीय.
Dil dooba Tere Pyar Me 🖤 pic.twitter.com/n2kIF7RKSw
— Payal Ghoshॐ (@iampayalghosh) November 8, 2023
तिने हार्टचा काळा इमोजी सुद्धा टाकलाय
त्यात आता अभिनेत्री पायल घोषने शमीला लग्नाची मागणी घातलीय. आता पायल घोषने X वर आणखी एक पोस्ट टाकलीय. तिचा इशारा नेमका कुठे आहे? ते स्पष्ट नाहीय. तिने सेल्फी टाकताना एक मेसेज पोस्ट केलाय. ‘दिल डुबा तेरे प्यार में’, असा मेसेज तिने लिहिलाय. तिने हार्टचा काळा इमोजी सुद्धा टाकलाय. ही शमीसाठी पोस्ट आहे किंवा कुणासाठी ते तिने स्पष्ट केलेलं नाहीय. नेटीझन्सनी त्यावर वेगवेगळ्या कमेंट केल्या आहेत. ‘मोहोम्मद शमी के प्यार में’, ‘शमी भाई के लिये’ अशा कमेंट्स आहेत. शमीने चालू वर्ल्ड कपमध्ये 4 सामन्यात 16 विकेट काढल्यात. ‘पटेल की पंजाबी शादी’ या चित्रपटात पायल घोष शेवटची दिसली होती. याआधी तिने प्रसिद्ध दिग्दर्शक अनुराग कश्यपवर गंभीर आरोप केले होते. अनुराग कश्यपवर लैंगिक छळाचा आरोप केला होता.