ब्रिस्बेन: T20 वर्ल्ड कप 2022 मध्ये श्रीलंकेने आज अफगाणिस्तानचा 6 विकेटने पराभव केला. ग्रुप 1 मधील हा सामना ब्रिस्बेनच्या गाबा मैदानावर खेळला गेला. अफगाणिस्तानच्या टीमने 20 ओव्हरमध्ये 144 धावा केल्या. श्रीलंकेच्या टीमने 4 विकेट गमावून 19 व्या ओव्हरमध्ये विजयी लक्ष्य गाठले. धनंजय डीसिल्वा श्रीलंकेच्या विजयाचा हिरो ठरला. त्याने नाबाद अर्धशतक झळकवून टीमला विजय मिळवून दिला. धनंजयने 42 चेंडूत नाबाद 66 धावा फटकावल्या. वानेंदु हसारंगाने 4 ओव्हरमध्ये अवघ्या 13 रन्स देऊन 3 विकेट काढले.
अफगाणिस्तानचे किती पॉइंटस?
या विजयानंतर श्रीलंकेची टीम सेमीफायनलच्या शर्यतीत कायम आहे. अफगाणिस्तानची टीम टी 20 वर्ल्ड कपमधून बाहेर गेली आहे. अफगाणिस्तानच्या टीमला 4 मॅचमध्ये फक्त 2 पॉइंटस मिळवता आले आहेत. पावसामुळे मॅच रद्द झाल्याने हे पॉइंटस मिळाले आहेत. टुर्नामेंटमधील त्यांचा हा दुसरा पराभव आहे.
धनंजयने श्रीलंकेला मिळवून दिला विजय
श्रीलंकेची सुरुवात चांगली झाली नव्हती. पथुम निसंकाला 10 रन्सवर मुजीब उर रहमानने आऊट केलं. पहिल्या 6 ओव्हरमध्ये अफगाणिस्तानच्या गोलंदाजांनी श्रीलंकेला जखडून ठेवलं होतं. मिडल ओव्हर्समध्ये राशिद खानने दबाव वाढवला. त्याने 25 धावांवर खेळणाऱ्या कुसल मेंडिसला आऊट केलं. धनंजय डीसिल्वाने मात्र कमालीची फलंदाजी केली. त्याने आक्रमक बॅटिंग केली. डिसिल्वाने 42 चेंडूत नाबाद 66 धावा फटकावल्या. चरित असालंका आणि भानुका राजपक्षेकडून चांगली साथ मिळाली. अफगाणिस्तानकडून राशिद आणि मुजीबने प्रत्येकी 2-2 विकेट घेतल्या.
अफगाणिस्तानचे फलंदाज फेल
गाबाच्या पीचवर अफगाणिस्तानचे फलंदाज अडखळत खेळत होते. ओपनर्सनी 42 धावांची भागीदारी केली. पण धावांमध्ये वेग नव्हता. गुरबाजच्या रुपात अफगाणिस्तानला पहिला झटका बसला. त्याने 28 धावा केल्या. 11 व्या ओव्हरमध्ये उस्मान घानीला हसारंगाने पॅव्हेलियनमध्ये पाठवलं. इब्राहिम जादरान 22 धावांवर आऊट झाला.