शाब्बास पठाण! अफगाणिस्तानच्या मंत्र्यांचा राशिद खानला व्हिडीओ कॉल, स्वागतासाठी मोठी तयारी

| Updated on: Jun 26, 2024 | 6:41 PM

अफगाणिस्तानचे परराष्ट्र मंत्री आमिर खान मुत्तकी यांनी राशिद खान याच्यासोबत व्हिडीओ कॉलवर बातचित केली. ते राशिदसोबत पश्तो भाषेत बोलत होते. त्यांनी अफगाणिस्तान संघाच्या कामगिरीवर आनंद व्यक्त केला.

शाब्बास पठाण! अफगाणिस्तानच्या मंत्र्यांचा राशिद खानला व्हिडीओ कॉल, स्वागतासाठी मोठी तयारी
Follow us on

अफगाणिस्तान संघाने टी-ट्वेन्टी विश्वचषक स्पर्धेत ऐतिहासिक कामगिरी केली आहे. अफगाणिस्तान विरुद्ध बांगलादेश यांच्यातील शेवटच्या सुपर 8 च्या सामन्यामध्ये अफगाणिस्तानचा 8 धावांनी विजय झाला. हा सामना अतिशय थरारक झाला. या सामन्यात कोण जिकेल? याबाबत शेवटपर्यंत सस्पेन्स कायम राहिला होता. पण अफगाणिस्तानच्या गोलंदाजांनी आपला करिश्मा दाखवत विजय खेचून आणला. अफगाणिस्तान संघाने या टी-ट्वेन्टी विश्वचषक स्पर्धेत खूप चांगली कामगिरी केली. त्यांनी आधी न्यूजीलंड सारख्या बलाढ्य संघाचा पराभव केला. नंतर त्यांनी ऑस्ट्रेलिया संघाचा पराभव केला. यानंतर त्यांनी बांगलादेश संघाचा पराभव करत थेट सेमीफायनलमध्ये एन्ट्री मारली. त्यांच्या या कामगिरीवर त्यांच्या देशातही आनंदाचं वातावरण आहे. जगभरातील क्रिकेट प्रेमींकडून अफगाणिस्तानच्या संघाचं अभिनंदन केलं जात आहे. विशेष म्हणजे अफगाणिस्तानच्या परराष्ट्र मंत्र्यांनीदेखील अफगाणिस्तानचा कर्णधार राशिद खानला व्हिडीओ कॉल करत त्याचं अभिनंदन केलं.

अफगाणिस्तानचे परराष्ट्र मंत्री आमिर खान मुत्तकी यांनी राशिद खान याच्यासोबत व्हिडीओ कॉलवर बातचित केली. ते राशिदसोबत पश्तो भाषेत बोलत होते. त्यांची बोलण्याची शैली पाहून ते अफगाणिस्तान टीमच्या कामगिरीवर खूश असल्याचं बघायला मिळत आहे. मंत्री मत्तकी यांनी अफगाणिस्तान संघाचं सेमीफायनलमध्ये पोहोचल्याबद्दल अभिनंदन केलं. तसेच त्यांनी पुढच्या सामन्यासाठी संघाला शुभेच्छा देखील दिल्या.

हे सुद्धा वाचा

सामन्यात नेमकं काय घडलं?

बांग्लादेश विरोधातील सामन्यात अफगाणिस्तान संघाने नाणेफेक जिंकत आधी फलंदाजी करण्याचा निर्णय घेतला होता. अफगाणिस्तान संघाने 20 ओव्हरमध्ये 5 विकेट देत 115 धावा केल्या होत्या. रहमानुल्लाह गुरबाजने सर्वाधिक 43 धावा केल्या होत्या. पण अफगाणिस्तानच्या फलंदाजीनंतर पाऊस पडला. त्यामुळे बांगलादेशच्या फलंदाजीवेळी 1 ओव्हर कापण्यात आली. त्यामुळे बांगलादेशला 19 ओव्हरमध्ये 114 धावांचं आव्हान देण्यात आलं.

अफगाणिस्तानने दिलेल्या 114 धावांचा पाठलाग करताना बांगलादेशच्या फलंदाजांची फार वाईट कामगिरी राहिली. अफगाणिस्तानच्या गोलंदाजांपुढे त्यांचा निभाव लागला नाही. त्यामुळे बांग्लादेश संघ 17.5 ओव्हरमध्ये 105 धाव करत ऑल आऊट झाला. अफगाणिस्तानच्या राशिद खान आणि नवीन उल हक या गोलंदाजांनी प्रत्येकी 4 विकेट घेतल्या. तर फजलहक फारुकी आणि गुलबदीन नईब यांनी प्रत्येकी एक विकेट घेतली. या विजायमुळे अफगाणिस्तान संघाला टी-ट्वेन्टी वर्ल्ड कपच्या सेमीफायनलमध्ये एन्ट्री मिळाली.