T20 Cricket World Cup 2021: भारतीय क्रिकेट संघाने (Indian Cricket Team) विश्वचषकातील (T20 World Cup) पहिले दोन सामने गमावल्यानंतकर तिसऱ्या सामन्यात दमदार पुनरागमन केलं. भारत विरुद्ध अफगाणिस्तान (India vs Afghanistan) सामन्यात भारताने उत्तम विजय मिळवला. या सामन्यात भारताने 210 धावांचां डोंगर उभा करुन अफगाणिस्तानला 144 धावांवर रोखत 66 धावांनी विजय मिळवला. सामन्यात अफगाणिस्तानला पराभव स्वीकारावा लागला असला तरी एक आनंदाची गोष्ट त्यांच्यासाठी घडली.
सामन्यात अफगाणिस्तान संघातून नवीन उल हक याने आपला पहिला सामना खेळला. विशेष गोष्ट म्हणजे या वेगवान गोलंदाजाची अॅक्शन अगदी भारतीय स्टार खेळाडू जसप्रीत बुमराहसारखी आहे. तुम्हाला पटत नसेल तर आयसीसीने त्यांच्या अधिकृत ट्विटर हँडलवरुन नवीन आणि बुमराह यांची गोलंदाजी दाखवणारा व्हिडीओही पोस्ट केला आहे.
नवीन याची अॅक्शन बुमराहसारखी असली तरी त्याला गोलंदाजीमध्ये खूप सरावाची गरज आहे. कारण भारताविरुद्धही त्याने 4 षटकात 59 धावा दिल्या. त्याला एकही विकेट मिळाली नाही. आतापर्यंत नवीनने 12 टी20 आणि 7 एकदिवसीय सामने खेळले आहेत. एकदिवसीय सामन्यात त्याच्या नावावर 14, तर टी20 मध्ये 18 विकेट्स आहेत.
सामन्यात नाणेफेक जिंकत अफगाणिस्तान संघाने इतर बहुतांश संघ यंदाच्या विश्वचषकात निवडत असल्याप्रमाणे प्रथम गोलंदाजीचा निर्णय घेतला. पण हा भारतीय सलामीवीरांना चूकीचा ठरवत धडाकेबाज फलंदाजी केली. केएल राहुल आणि रोहित शर्मा जोडीने सलामीला येत तब्बल 140 धावांची भागिदारी केली. त्यानंतर रोहित पाठोपाठ राहुलही बाद झाला. रोहितने 47 चेंडूत 3 षटकार आणि 8 चौकार ठोकत 74 धावा केल्या. तर राहुलने 48 चेंडूत 2 षटकार आणि 6 चौकार ठोकत 69 धावा केल्या. दोघेही बाद झाल्यावर फलंदाजीला आलेल्या पंत आणि पंड्या यांनीही आक्रमक फलंदाजी केली. पंड्याने नाबाद 35 आणि पंतने नाबाद 27 धावा केल्या. ज्याच्या जोरावर भारताने 210 धावा केल्या.
211 धावांचं मोठं लक्ष्य गाठण्यासाठी मैदानात आलेल्या अफगाणिस्तान संघाची सुरुवातच खराब झाली. पहिली सर्व फलंदाजाची फळी पटपट बाद होत गेली. पण कर्णधार मोहम्मद नबी आणि करीम जनत यांनी एक चांगली भागिदारी करत संघाचा डाव सावरण्याचा प्रयत्न केला. नबीने 35 धावा केल्या. तर जनत याने नाबाद 42 धावा केल्या. पण भारताचं 211 धावांचं मोठं लक्ष्य अफगाणिस्तान गाठू शकलं नाही. ज्यामुळे भारताचा 66 धावांनी विजय झाला. भारताकडून सर्वाधिक विकेट्स शमीने घेतल्या. त्याने 3 गड्यांना बाद केलं. तर आश्विनने 2, बुमराह आणि जाडेजाने प्रत्येकी एक विकेट मिळवली.
हे ही वाचा :
मोठी बातमी: राहुल द्रविड टीम इंडियाचा नवा हेड कोच, भारतीय क्रिकेट नियामक मंडळाची माहिती
(Afghanistan bowler Naveen ul haq bowling action is same like Jasprit bumrah)