Team India: राशिद खानचं टीम इंडियाच्या वर्ल्ड कप विजयानंतर खास ट्विट, रोहितचा उल्लेख

| Updated on: Jul 02, 2024 | 8:39 PM

Rashid Khan On Rohit Sharma: भारतीय क्रिकेट संघांने दक्षिण आफ्रिकेला पराभूत करत वर्ल्ड कपवर नाव कोरलं.राशिद खान याने भारतीय संघासाठी ट्विट केलंय. त्यामध्ये त्याने टीम इंडिया आणि कॅप्टन रोहितचा उल्लेख केला आहे.

Team India: राशिद खानचं टीम इंडियाच्या वर्ल्ड कप विजयानंतर खास ट्विट, रोहितचा उल्लेख
rashid khan and rohit sharma
Follow us on

टीम इंडियाने दक्षिण आफ्रिकेला पराभूत करत आयसीसी टी 20 वर्ल्ड कप ट्रॉफी जिंकली. टीम इंडिया विरुद्ध दक्षिण आफ्रिका यांच्यात 29 जून रोजी बारबाडोस येथे महाअंतिम सामना पार पडला. या सामन्यात टीम इंडियाने टॉस जिंकून बॅटिंगचा निर्णय केला. टीम इंडियाने 176 धावा केल्या. त्यामुळे दक्षिण आफ्रिकेला विजयासाठी 177 धावांचं आव्हान मिळालं. दक्षिण आफ्रिकेने या धावांचा जबरदस्त पाठलाग करत विजयाजवळ पोहचले होते. मात्र टीम इंडियाने निर्णायक क्षणी सामना आपल्या बाजूने फिरवला आणि वर्ल्ड कपवर आपलं नाव कोरलं. टीम इंडियाने 7 धावांनी थरारक विजय मिळवला.

टीम इंडियाचं साऱ्याच स्तरातून या विजयासाठी अभिनंदन केलं गेलं आणि केलं जात आहे. आजी माजी दिग्गजांनीही टीम इंडियासाठी सोशल मिडियावर पोस्टचा किस पाडला. अफगाणिस्तानचा कॅप्टन राशिद खान यानेही टीम इंडियाचं अभिनंदन करणारी एक पोस्ट केली आहे. राशिदची ही एका वाक्यातच पोस्ट आहे. राशिदने कॅप्टन रोहितसह संपूर्ण टीम इंडियाचा ट्रॉफीसोबत असलेला फोटो सोशल मीडियावर टाकला आहे. “रोहित शर्मा आणि टीमचं टी 20 वर्ल्ड कप जिंकल्याबद्दल अभिनंदन”, असं राशिदने म्हटलं आहे.

टीम इंडियाने या स्पर्धेत एकही सामना गमावला नाही. टीम इंडियाने एकूण 8 सामने जिंकून वर्ल्ड कप ट्रॉफी पटकालवली. टीम इंडियाने साखळी आणि सुपर 8 मधील प्रत्येकी 3 असे एकूण 6 सामने जिंकले. टीम इंडियाचा सुपर 8 मधील पहिला सामना हा अफगाणिस्तान विरुद्ध झाला होता. टीम इंडियाने या सामन्यात अफगाणिस्तान विरुद्ध विजय मिळवला होता. तर यानंतरही अफगाणिस्तानने ऑस्ट्रेलिया आणि बांगलादेशचा पराभव करुन सेमी फायनलमध्ये धडक मारली. मात्र अफगााणिस्तानला उपांत्य फेरीत खास करता आलं नाही. दक्षिण आफ्रिकेच्या धारदार बॉलिंगसमोर अफगाणिस्तान फुस्स ठरली. दक्षिण आफ्रिकेने सहज सामना जिंकला आणि अंतिम फेरीत धडक मारली. मात्र अंतिम फेरीत टीम इंडियाने दक्षिण आफ्रिकेला पराभूत करत 17 वर्षांनंतर टी 20 वर्ल्ड कप जिंकला.

राशिद खान याचं ट्विट

रोहित-विराट आणि जडेजाची निवृत्ती

दरम्यान टी 20 वर्ल्ड कप विजयानंतर टीम इंडियाचा कॅप्टन रोहित शर्मा, विराट कोहली आणि रवींद्र जडेजा या तिघांनी या क्रिकेट प्रकारातून निवृत्ती जाहीर केली.