मुंबई : प्रत्येक आंतरराष्ट्रीय स्तरावर खेळणारा खेळाडू हा आधी आपल्या एरियामध्ये क्रिकेट खेळत असतो. मग अगदी सचिनपासून ते विराट प्रत्येकानेच खेळाची सुरुवात ते रहात असलेल्या ठिकाणाहून केली. अनेकजण हे क्रिकेटर बनायचा यासाठी मोठ मोठ्या कोचिंग लावत असतात. पण आज आपण ज्या खेळाडूबद्दल बोलतोय तो खेळाडू एका शरणार्थी शिबिरामध्ये आजूबाजूला युद्धजन्य परिस्थिती असताना क्रिकेटचा सराव करुन एक दिग्गज क्रिकेटर बनला. सुरुवातीला टाईमपास म्हणून क्रिकेट खेळणारा हा खेळाडू पुढे जाऊन देशाचा सर्वोत्कृष्ट खेळाडू बनेल असं कोणाला वाटलं ही नव्हता. पण हे करुन दाखवलं अफगानिस्तान क्रिकेट संघाचा माजी कर्णधार नवरोज मंगलने (Nawroz Mangal). आजच्याच दिवशी 15 जुलैला 1984 मध्ये जन्म झालेल्या नवरोजची कहानी खरच इतरांपेक्षा बरीच वेगळी आहे.
नवरोज मंगल याचा जन्म 1984 मध्ये काबूलमध्ये झाला. लहानपणी पाकिस्तान येथे एक शरणार्थी शिबिरात रहाणारा नवरोज टाईमपास म्हणून क्रिकेट खेळू लागला पण 2001 मध्ये अमेरिकी सेनेने अफगानिस्तानमधून तालिबानचे शासन संपवलं आणि नवरोजही इतरांसोबत त्याच्या मायदेशी परतला. त्याचवेळी अफगानिस्तान क्रिकेट संघ तयार केला जात होता अफगानिस्तानचे कोच ताज मलिक यांची नजर नवरोजवर पडली आणि त्यांनी त्याला संघात सामिल करण्यासाठी प्रयत्न सुरु केले. पण नवरोजच्या वडिलांना क्रिकेट खेळणं पसंत नसल्याने त्यांनी त्याला मनाई केली होती. त्यावेळी ताज यांनी नवरोजच्या वडिलांचे मतपरिवर्तन करण्यासाठी एक संपूर्ण रात्र त्यांना विनंती केली. तेव्हा जाऊन त्यांनी नवरोजला क्रिकेट खेळण्याची मान्यता दिली. त्यानंतर नवरोजने कायदे आजम ट्रॉफी ग्रेड टू मध्ये नौशेरा संघाविरुद्ध पदार्पण केले. त्यानंतर 2004 मध्ये एसीसी ट्रॉफीमध्ये ओमान संघाविरुद्ध आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्येही पदार्पण करत स्पर्धेत 271 धावा ठोकल्या.
Happy birthday to former Afghanistan captain Nawroz Mangal ?
Under his captaincy, ?? achieved ODI status in 2009 and also qualified for their maiden @T20WorldCup in 2010. pic.twitter.com/QydTHAGsdf
— ICC (@ICC) July 15, 2021
2007 मध्ये नवरोजला अफगानिस्तान क्रिकेट संघाचा कर्णधार करण्यात आलं. त्यानंतर अफगानिस्तानला वनडे क्रिकेट टीमचा दर्जा मिळाला. 2010 च्या टी-20 वर्ल्ड कपमध्येही नवरोजने संघाची कप्तानी सांभाळत चांगले प्रदर्शन केले. त्यानंतर 2013 मध्ये शारजाहमध्ये नवरोजने कारकिर्दीतील पहिले शतक स्कॉटलँडविरुद्ध ठोकले. 2017 मध्ये आंतरराष्ट्रीय क्रिकेटमधून निवृत्ती घेत नवरोज संघाचा नॅशनल चीफ सिलेक्टर बनला. त्याने आपल्या कारकिर्दीत अफगानिस्तानकडून 49 वनडे सामने खेळले. ज्यात 27.11 च्या सरासरीने 1139 रन्स केले. ज्यात दो शतकांसह चार अर्धशतकांचाही समावेश आहे.तसेच 32 टी-20 सामन्यात त्याने 18.03 च्या सरासरीने दोन अर्धशतकांच्या मदतीने 505 रन बनवले.
हे ही वाचा :
मोठी बातमी : ऋषभ पंतला कोरोनाच्या डेल्टा व्हेरिएंटचा संसर्ग, टीम इंडियाला मोठा झटका, आता कीपर कोण?
भारतीय खेळाडूंचा अतिशाहणपणा, गरज नसताना मिरवले, आता कोरोनाने जिरवली!
(Afghanistan Legend Cricketer Nawroz Mangal birthday on this day Marathi)