SL vs BAN | Timed Out चा वाद, कॉमन सेन्स काढलं, श्रीलंकेच्या दोघांना चुकवावी लागू शकते किंमत

| Updated on: Nov 07, 2023 | 8:37 AM

SL vs BAN | असं याआधी कधी क्रिकेटच्या मैदानात झालं नव्हतं, जे पहिल्यांदा घडलं. दिल्लीत हा सामना खेळला जात होता. या घटनेचे पडसाद शेवटपर्यंत सामन्यात दिसून आले. या निर्णयावरुन बरेच वाद-प्रतिवाद सुरु आहेत. या सामन्यामध्ये दोन्ही टीम्सकडून खेळ भावना जपली गेली नाही.

SL vs BAN | Timed Out चा वाद, कॉमन सेन्स काढलं, श्रीलंकेच्या दोघांना चुकवावी लागू शकते किंमत
sl vs ban time out row
Image Credit source: PTI
Follow us on

नवी दिल्ली : देशाच्या राजधानीत दिल्लीमध्ये 6 नोव्हेंबरला श्रीलंका विरुद्ध बांग्लादेश हा सामना झाला. वर्ल्ड कपमधली ही मॅच खूप वादग्रस्त ठरली. या मॅचमध्ये जे घडलं, ते वर्ल्ड कपच्याच नाही, तर संपूर्ण क्रिकेटच्या इतिहासात पहिल्यांदा घडलं. पहिल्यांदा कुठला फलंदाज Time Out झाला. एंजलो मॅथ्यूज हा क्रिकेटच्या इतिहासातील टाइम आऊट होणारा पहिला फलंदाज आहे. या निर्णयावरुन बरेच वाद-प्रतिवाद सुरु आहेत. या बाबतीत अखेरीस निर्णय जेव्हा मॅथ्यूजच्या विरोधात गेला, तेव्हा तो भडकला. सामना पूर्ण होईपर्यंत हा वाद कायम दिसून आला. सामन्यानंतर आरोप-प्रत्यारोपाचा खेळ रंगला आहे. या दरम्यान एंजलो मॅथ्यूज आणि कुसल मेंडिसने जे केलय, त्यामुळे त्यांच्याविरुद्ध कारवाई होऊ शकते. श्रीलंकेचा कॅप्टन कुसल मेंडिस आणि एंजलो मॅथ्यूज या दोघांनी असं केलं काय? हा प्रश्न आहे. या दोघांनी जे केलं ते योग्य असेल किंवा अयोग्य, पण एक खेळाडू म्हणून असं करणं योग्य नाही.

क्रिकेट किंवा कुठल्याही खेळ नियमाच्या विरोधात आहे. त्यामुळेच या दोघांवर कारवाई होऊ शकते. एंजलो मॅथ्यूज आणि कुसल मेंडिस दोघांनी अंपायरवर निशाणा साधला. दोघांनी चौथ्या अंपायरच्या निर्णयावर फक्त प्रश्नचिन्ह निर्माण केलं नाही, तर सरळ, सरळ हा निर्णय चुकीचा होता असं म्हटलं. टाइम आऊटच्या निर्णयावर मॅथ्यूज म्हणाला की, “अंपायरने इथे चूक केलीय. त्या घटनेचा व्हिडिओ समोर आलाय. हेल्मेट दुरुस्त केल्यानंतर माझ्याकडे 5 सेकंदाचा वेळ शिल्लक होता. माझ फक्त एवढच म्हणणं आहे की, सुरक्षा सर्वात आधी आहे. हेल्मेट शिवाय गोलंदाजीचा सामना करु शकत नव्हतो”

‘ते कोणासोबतही होऊ शकतं’

मॅथ्यूजचा मुद्दा पुढे नेत श्रीलंकेचा कॅप्टन कुसल मेंडिसने अंपायरच्या कॉमन सेन्सवर प्रश्न उपस्थित केला. “मी अंपायरच्या निर्णयावर नाराज आहे. मला त्यांचं कॉमन सेन्स समजलं नाही. एंजोल मॅथ्यूजच्या हेल्मेट बरोबर जे झालं, ते कोणासोबतही होऊ शकतं” असं मेंडिस म्हणाला. ‘

कशावरुन कारवाई होऊ शकते?

एंजलो मॅथ्यूज क्रीजवर हेल्मेटची स्ट्रीप व्यवस्थित करत होता, त्यावेळी त्याला टाइम आऊट देण्यात आलं. बांग्लादेशचा कॅप्टन शाकिब अल हसनच्या अपीलनंतर अंपायरनी त्याला आऊट दिलं. श्रीलंकन क्रिकेटर्सनी आपला मुद्दा मांडला. असं करण चुकीच नाहीय, पण दोघांनी अंपायरच्या निर्णयावर जे प्रश्नचिन्ह उपस्थित केलय, ते चुकीच आहे. कुसल मेंडिस जे कॉमन सेन्सबद्दल बोलला, त्यावर कारवाई होऊ शकते.