मुंबई : CSK चा कॅप्टन एमएस धोनीच्या प्रकृतीबाबत महत्वाची अपडेट आहे. IPL 2023 चा सीजन संपल्यानंतर धोनी रुग्णालयात दाखल होणार अशी बातमी होती. आज एमएस धोनीच्या गुडघ्यावर शस्त्रक्रिया झाल्याची माहिती आहे. 1 जूनच्या सकाळी धोनीच्या गुडघ्यावर शस्त्रक्रिया झाली. 31 मे रोजी त्याच्या गुडघ्याची तपासणी करण्यात आली होती. मुंबईच्या किकोलाबेन रुग्णालयात तो तपासणीसाठी गेला होता.
एमएस धोनीच्या नेतृत्वाखाली चेन्नई सुपर किंग्सने IPL 2023 च विजेतेपद मिळवलं. मंगळवारी चेन्नईने फायनलमध्ये अटी-तटीच्या सामन्यात गुजरात टायटन्सवर शेवटच्या चेंडूवर 5 विकेट राखून विजय मिळवला. चेन्नईने या विजेतेपदासह आयपीएलमध्ये पाच ट्रॉफी जिंकण्याच्या मुंबई इंडियन्सच्या रेकॉर्डची बरोबरी केली. चेन्नईने धोनीच्या नेतृत्वाखाली विजय मिळवला. तो चेन्नईच्या विजयाचा मुख्य शिल्पकार होता.
त्रास अंगावर काढला
धोनीला आयपीएलचा सीजन चालू असताना गुडघे दुखापतीचा त्रास जाणवत होता. धोनी मैदानावर अनेकदा पाय खेचत चालताना दिसला होता. चेन्नईला 5 व्यां दा चॅम्पिन बनवल्यानंतर एमएस धोनी गुडघ्याची तपासणी करण्यासाठी डॉक्टरांकडे गेला होता. PL 2023 च्या संपूर्ण सीजनमध्ये गुडघे दुखापतीचा त्रास धोनीने अंगावर काढला. फक्त चेन्नई सुपर किंग्सच्या विजयासाठी तो मैदानात होता. आता CSK ची टीम अजिंक्य ठरल्यानंतर त्याने हॉस्पिटलमध्ये जाऊन गुडघ्याची तपासणी केली.
दुखापतीबद्दल इतरांना कधी समजलं?
IPL 2023 मध्ये पहिल्याच सामन्यात खेळताना गुडघे दुखापतीचा त्रास झाला होता. 12 एप्रिलला राजस्थान रॉयल्स विरुद्ध सामन्याच्यावेळी धोनीचा गुडघे दुखापतीचा त्रास सर्वांच्या लक्षात आला. त्यानंतर धोनीच्या दुखापतीबद्दल चेन्नई सुपर किंग्सचे हेड स्टीफन फ्लेमिंग आणि बॅटिंग कोच माइक हसी यांनी वक्तव्य केली होती. त्यावरुन धोनीला गुडघे दुखापतीचा त्रास होत असल्याच स्पष्ट झालं.
म्हणून तो बॅटिंगसाठी शेवटला यायचा
IPL सामन्यादरम्यान अनेक व्हिडिओमधून धोनी गुडघे दुखापतीच्या समस्येने त्रस्त असल्याच दिसलं. त्यामुळे एकेरी-दुहेरी धावा पळून काढताना धोनीला अडचणी येत होत्या. त्यामुळे तो बॅटिंगसाठी सुद्धा शेवटला यायचा.