Rohit sharma : ‘आम्ही तुम्हाला पाकिस्तानसारखं…’, स्वत:च्या पराभवाबद्दल बोलताना रोहित मध्येच पाकवर का घसरला?

| Updated on: Mar 03, 2023 | 2:02 PM

IND vd AUS 3rd Test : भारतीय कॅप्टन रोहित शर्मा 3 दिवसात संपणाऱ्या कसोटी सामन्याबद्दल महत्त्वाची गोष्ट बोलला. भारत आणि ऑस्ट्रेलियामध्ये सुरु असलेल्या टेस्ट सीरीजमधील पहिले तीन कसोटी सामने 3 दिवसात संपले आहेत.

Rohit sharma : आम्ही तुम्हाला पाकिस्तानसारखं..., स्वत:च्या पराभवाबद्दल बोलताना रोहित मध्येच पाकवर का घसरला?
Follow us on

IND vd AUS 3rd Test : ऑस्ट्रेलियाने तिसऱ्या टेस्ट मॅचमध्ये टीम इंडियाला 9 विकेटने हरवलं. इंदोरमध्ये तिसरा कसोटी सामना झाला. भारताने पाहुण्या ऑस्ट्रेलियन टीमला विजयासाठी 76 धावांच टार्गेट दिलं होतं. ऑस्ट्रेलियान एक विकेट गमावून आरामात हे लक्ष्य पार केलं. तिसरा कसोटी सामना अडीच दिवसात संपला. सीरीजमधील पहिल दोन कसोटी सामने 3 दिवसात निकाली निघाले होते. पराभवानंतर भारतीय कॅप्टन रोहित शर्माने 3 दिवसात संपणाऱ्या कसोटी सामन्याबद्दल महत्त्वाची गोष्ट बोलला.

रोहितने इंदोर कसोटीनंतर बोलताना सांगितलं की, पराभव मान्य आहे. पण पाकिस्तानी टीमसारखं लोकांना बोर करणार नाही. मॅचनंतर प्रेस कॉन्फरन्समध्ये भारतीय कॅप्टन म्हणाला की, “भारताबाहेरही कसोटी सामने पूर्ण 5 दिवस चालत नाहीयत. हा स्किल्सचा भाग आहे”

रोहितने पाकिस्तानचा उल्लेख का केला?

पाकिस्तानात झालेल्या 3 कसोटी सामन्यांना लोकांनी बोरिंग ठरवलं होतं. आम्ही कसोटी सामने इंटरेस्टिंग बनवतोय असं रोहित शर्मा म्हणाला. पाकिस्तानने मागचे 5 कसोटी सामने मायदेशात न्यूझीलंड आणि इंग्लंड विरुद्ध खेळले आहेत. न्यूझीलंड विरुद्ध 2 आणि इंग्लंड विरुद्ध पाकिस्तान टीमने 3 कसोटी सामने खेळले. यात 3 कसोटी सामने पूर्ण 5 दिवस चालले. न्यूझीलंड विरुद्ध दोन्ही कसोटी सामने ड्रॉ झाले.


टीम इंडियाच्या पराभवाबद्दल रोहित काय म्हणाला?

रोहितने पराभव मान्य केल्यानंतर सांगितलं की, “आम्हाला आणखी काही धावा बनवण्याची आवश्यकता होती. कमी धावा केल्याने आम्ही निराश आहोत. पहिल्या इनिंगमध्ये आम्ही खूप खराब क्रिकेट खेळलो”

तिसऱ्या टेस्ट मॅचच्या दोन इनिंगमध्ये नाथन लियॉनने दोन्ही डावात मिळून 11 विकेट घेतल्या. रोहित शर्माने त्याचं कौतुक केलं. “मी शेन वॉर्न, मुथय्या मुरलीधरनचा सामना केलेला नाही. पण माझ्यासाठी नाथन लियॉन भारतात आलेला सर्वोत्तम परदेशी फिरकी गोलंदाज आहे”