Gautam Gambhir IPL 2023 : गौतम गंभीरची नोकरी जाणार? MI कडून झालेल्या पराभवाचा साइड इफेक्ट

| Updated on: May 25, 2023 | 11:35 AM

Gautam Gambhir IPL 2023 : मॅचनंतर गौतम गंभीरचा मालकांसोबतचा तो फोटो झाला व्हायरल. आयपीएलमधील सर्वाच यशस्वी टीम असलेल्या मुंबईने 183 धावांच टार्गेट लखनऊच्या टीमला दिलं होतं. कृणाल पांड्याची टीम संपूर्ण 20 ओव्हरही खेळू शकली नाही.

Gautam Gambhir IPL 2023 : गौतम गंभीरची नोकरी जाणार? MI कडून झालेल्या पराभवाचा साइड इफेक्ट
Kohli vs Gambhir : विराट कोहलीचा जयघोष सुरु होताच गौतम गंभीर थांबला आणि काय केलं पाहा Video
Image Credit source: BCCI/IPL
Follow us on

चेन्नई : लखनऊ सुपर जायंट्स टीमचा सलग दुसऱ्यांदा आयपीएल एलिमिनेटरमध्ये पराभव झालाय. रोहित शर्माच्या मुंबई इंडियन्सने लखनऊला 81 धावांनी पराभूत करुन टुर्नामेंटमधील त्यांचा प्रवास संपवला. लखनऊन आधीच मुंबईसमोर गुडघे टेकले होते. संपूर्ण सामन्यात लखनऊची टीम कुठेच मुंबई इंडियन्स विरुद्ध फाईट बॅक करताना दिसली नाही. आयपीएलमधील सर्वाच यशस्वी टीम असलेल्या मुंबईने 183 धावांच टार्गेट लखनऊच्या टीमला दिलं होतं. कृणाल पांड्याची टीम संपूर्ण 20 ओव्हरही खेळू शकली नाही. 16.3 ओव्हर्समध्ये त्यांचा डाव 101 धावात आटोपला.

या लाजिरवाण्या पराभवानंतर टीमचा मेंटॉर गौतम गंभीर निराश दिसला. या पराभवानंतर टीमचे मालक संजीव गोयनका सोबतचा गंभीरचा एक फोटो व्हायरल झालाय.

नोकरी संकटात

गंभीरला मोठ्या प्रमाणात ट्रोल करण्यात आलं. व्हायरल फोटो पैाहून युजर्सनी गौतम गंभीरची नोकरी संकटात असल्याच म्हटलं आहे. लखनऊ टीम केव्हाही त्याला मेंटॉर पदावरुन हटवू शकते, अशी चर्चा आहे. मॅच संपल्यानंतर टीमचे मालक संजीव गोयनका गंभीरसोबत चर्चा करताना दिसले.

गंभीर मालकांना काय समजावत होता?

या चर्चेदरम्यान गोयनका यांच्या चेहऱ्यावर राग स्पष्ट दिसत होता. गंभीर त्यांना समजावण्याचा प्रयत्न करत होता. लखनऊ पॉइंट्स टेबलमध्ये तिसऱ्या स्थानावर होती. त्यांना लीग स्टेजमध्ये चौथ्या नंबरवर असलेल्या मुंबई इंडियन्सने हरवलं. संपूर्ण सीजनमध्ये लखनऊच्या टीमची बरीच चर्चा झाली. भले, ते प्लेऑफमध्ये पोहोचले, पण त्यांच्यावर बरीच टीका झाली. एलिमिनेटरमध्ये तर लखनऊच्या टीमने काही बालिश चूका केल्या.


लखनऊची टीम वादात

या मॅचमध्ये लखनऊ टीमने एक-दोन नाही, बऱ्याच चूका केल्या. या चूका खूपच बालिश होत्या. खेळाशिवाय लखनऊची टीम वादांमुळे देखील चर्चेत राहिली. टीमचा बॉलर नवीन उल हक आणि मेंटॉर गौतम गंभीर रॉयल चॅलेंजर्स बँगलोरचा स्टार फलंदाज विराट कोहलीला मैदानावरच भिडले होते.

इमेजला फटका

हा वाद पुढे सोशल मीडियावर सुद्धा कायम राहिला. त्याचा लखनऊच्या इमेजला फटका बसला. गौतम गंभीराचा संजीव गोयनका सोबतचा फोटो पाहून गंभीरचा लखनऊच्या टीमसोबतचा हा शेवटचा सीजना होता अशी चर्चा रंगलीय.