टीम इंडियाचा क्रिकेटपटू हार्दिक पांड्या सध्या चर्चेत आहे. दोनच दिवसांपूर्वी गुरुवारी त्याला डबल झटका बसला. टीम इंडियाच्या कर्णधारपदासाठी प्रबळ दावेदार असूनही त्याच्याजागी सूर्यकुमार यादवची कॅप्टनपदी वर्णी लागली. दुसरी बातमी त्याच्या व्यक्तीगत जीवनाशी निगडीत आहे. हार्दिक पांड्या आणि नताशा स्टानकोविक यांनी विभक्त होत असल्याच घटस्फोट झाल्याच जाहीर केलं. मागच्या काही महिन्यापासून याची चर्चा होती. हार्दिक आणि नताशामध्ये सर्वकाही आलबेल नसल्याच बोलल जात होतं. अखेर घटस्फोटाच्या वृत्ताने यावर शिक्कामोर्तब झालं. हार्दिक आणि नताशा दोघांनी इन्स्टावर पोस्ट लिहून वेगळ होत असल्याच जाहीर केलं. ‘मित्र बनून आम्ही आमच्या मुलाचा सांभाळ करु’ असं त्यांनी लिहिलं होतं. हार्दिक पांड्या-नताशाच्या या निर्णयाने पांड्याच्या चाहत्यांना धक्का बसला.
घटस्फोटानंतर हार्दिकने आता इन्स्टावर एका अभिनेत्रीला फॉलो करायला सुरुवात केली आहे. या बॉलिवूड अभिनेत्रीने सुद्धा हार्दिकला फॉलो केलय. यावरुन आता सोशल मीडियावर पुन्हा चर्चा सुरु झालीय. ही अभिनेत्री कोण आहे? तुम्हाला माहितीय का?. नताशा बरोबर घटस्फोट घेतल्यानंतर हार्दिक पांड्याने अनन्या पांडेला फॉलो करायला सुरुवात केली आहे. अनन्या आणि हार्दिकने इन्स्टाग्रामवर परस्पांना फॉलो केलय. सोशल मीडिया युजर्सनी त्यावरुन आता विविध चर्चा सुरु केल्या आहेत. काही युजर्स अशा पद्धतीने जोडण्याला बकवास ठरवत आहेत. फॉलो केलं म्हणून काय झालं? असं काहींच म्हणणं आहे. काहींनी असं सुद्धा म्हटलय, हार्दिक घटस्फोट होण्याची वाट पाहत होता.
ती अभिनेत्री या बॉलिवूड अभिनेत्याच्या प्रेमात होती
अनन्या पांडे आदित्य रॉय कपूर बरोबरच्या रिलेशनशिपमुळे चर्चेत होती. दोघांनी परस्परांना डेट केलं. अनेक ठिकाणी दोघे एकत्र दिसले. अनन्या आणि आदित्य दोघेही रिलेशनशिपबद्दल मोकळेपणाने बोलले नाहीत. मागच्या आठवड्यात अनंत अंबानी यांच्या लग्नातला हार्दिक आणि अनन्या पांडेचा एक व्हिडिओ समोर आला होता. त्यात दोघे डान्स, धमाल मस्ती करताना दिसले होते. त्यानंतरच हार्दिक आणि अनन्याच नाव जोडलं जातय.