अहमदाबाद: वेस्ट इंडिज विरुद्धच्या पहिल्या वनडेमध्ये (INDvsWI) भारताने आज सहा विकेट राखून विजय मिळवला. वेस्ट इंडिजने दिलेले 177 धावांचे लक्ष्य भारताने आरामात पार केलं. नियमित कर्णधार म्हणून रोहित शर्माचा (Rohit sharma) हा पहिलाच सामना होता. त्याने विजयी सुरुवात केली आहे. रोहितने स्वत: कर्णधारपदाला साजेसा खेळ दाखवला. त्याने 60 धावांची अर्धशतकी खेळी केली. पण भारताच्या विजयाचे खरे नायक ठरले, युजवेंद्र चहल आणि वॉशिंग्टन सुंदर. (Washington sundar) या दोघांच्या फिरकीने वेस्ट इंडिजला गुंडाळून टाकलं. वेस्ट इंडिजचे आघाडीचे फलंदाज या दोघांनीच बाद केले. त्यामुळेच भारताचा पुढचा मार्ग सोपा झाला. रोहित शर्माने कर्णधारपदाला साजेसा खेळ दाखवला. त्याने 51 चेंडूत 60 धावांची खेळी करताना दहा चौकार आणि एक षटकार लगावला.
सामन्यातनंतर प्रेझेंटेशन सेरेमनीमध्ये रोहित शर्माने कर्णधार म्हणून त्याचे विचार व्यक्त केले. “संघ म्हणून आम्हाला स्वत:हामध्ये सतत सुधारणा करायची आहे. प्रत्येकाने त्याच्या बाजूने चांगले प्रयत्न केले. आम्हाला काय मिळवायचय, त्या बद्दल आम्ही चर्चा केली आणि आम्ही ते सर्व केलं. होल्डर-एलेनने चांगली भागीदारी केली. आम्हाला ती जोडी फोडायची होती. काही बदल करायचे असतील, तर ते ही करु” असे रोहित म्हणाला.
“संघाल जे हवय ते मिळवणं, अंतिम लक्ष्य आहे. आम्हाला खूप काही बदल करायचा आहे, असं मला वाटत नाही. मी खेळाडूंना सांगीन की, तुम्ही तुम्हाला आव्हान द्या, कल्पक बना. मी दोन महिने मैदानापासून दूर होतो. पण आजचा सामना खेळायला उतरताना पूर्ण आत्मविश्वास होता. या सामन्यात नाणेफेकीच कौल महत्त्वाचा होता. तुम्ही जे ठरवलय ते करत राहिलात, तर तुम्ही कुठल्याही संघाला रोखू शकता. तुम्ही नाणेफेक जिंकली, तर काही गोष्टीचा फायदा मिळतो” असे रोहित म्हणाला.