CSK vs LSG : चेन्नई जिंकूनही MS Dhoni ने कॅप्टनशिप सोडण्याची वॉर्निंग का दिली? पहा VIDEO

| Updated on: Apr 04, 2023 | 8:20 AM

CSK vs LSG IPL 2023 : MS Dhoni ला काय खटकलं? तो इतका का चिडला? एमएस धोनीने मांडलेला मुद्दा योग्य आहे. कारण टी 20 क्रिकेटमध्ये ही चूक गुन्ह्यापेक्षा कमी नाही.

CSK vs LSG : चेन्नई जिंकूनही MS Dhoni ने कॅप्टनशिप सोडण्याची वॉर्निंग का दिली? पहा VIDEO
MS dhoni
Image Credit source: PTI
Follow us on

CSK vs LSG IPL 2023 : IPL च्या पीचवर 16 वा सामना चेन्नई सुपर किंग्स आणि लखनौ सुपर जायंट्समध्ये खेळला गेला. या मॅचमध्ये क्रिकेट चाहत्यांना ते सर्व पाहता आलं, ज्याची टी 20 सामन्यात त्यांना अपेक्षा असते. धावांचा पाऊस, विकेट्स, काही सुंदर इनिंग्स आणि धोनीचे सिक्स हे सर्वकाही या मॅचमध्ये होतं. चेन्नई सुपर किंग्सने हा सामना 12 धावांनी जिंकला. विजयानंतर CSK चा कॅप्टन एमएस धोनीने कौतुक करण्याऐवजी आपल्या बॉलर्सना वॉर्निंग दिली.

विजयानंतर एमएस धोनीने आपल्या गोलंदाजांना टार्गेट केलं. सहाजिकच विषय गंभीर आहे. CSK च्या वेगवान गोलंदाजांनी लखनौ सुपर जायंट्स विरुद्धच्या सामन्यात जे काम केलं, ते टी 20 क्रिकेटमध्ये कुठल्या गुन्ह्यापेक्षा कमी नाही. 20 ओव्हर्सच्या या मॅचमध्ये त्यांनी 16 एक्स्ट्रा चेंडू टाकले. त्यामुळे एमएस धोनी नाराज आहे.

जिंकूनही कमजोरीकडे लक्ष

लखनौ टीमच्या विरोधात चेन्नईच्या बॉलर्सनी 16 एक्स्ट्रा चेंडू टाकले. यात 13 वाइट आणि 3 नो बॉल आहेत. हाय स्कोरिंग मॅचमध्ये टीम जिंकूनही धोनीच लक्ष टीमच्या कमकुवत बाजूवर आहे. त्यामुळेच धोनीने आपल्या स्टाइलमध्ये बॉलर्सना इशारा दिला.


धोनीने वॉर्निंगमध्ये काय म्हटलय?

“गोलंदाजांनी वाइड आणि नो बॉल टाकणं कमी केलं पाहिजे. ही माझ्याकडून त्यांना दुसरी वॉर्निंग आहे. नाहीतर, पुढे जाऊन दुसऱ्या कॅप्टनच्या अंडर खेळण्यासाठी त्यांनी तयार रहाव” असं एमएस धोनी म्हणाला.

CSK कडून कोणी सर्वात जास्त वाइड, नो-बॉल टाकले

CSK कडून सर्वात जास्त वाइड आणि नो बॉल तृषार देशपांडेने टाकले. IPL 2023 मधील पहिला इम्पॅक्ट प्लेयरने 4 वाइड आणि 3 नो बॉल टाकले. त्याशिवाय दीपक चाहरने 5 वाइड, हंगरगेकरने 3 वाइड आणि मोईन अलीने 1 वाइड बॉल टाकला.